शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 1:18 PM

Janashirwad Yatra of Bhagwat Karad in Marathawada : डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते.

ठळक मुद्दे१६ ऑगस्टपासून होणार सुरुवात गोपीनाथ गडावर जाऊन आशीर्वाद घेणार

औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील भाजपची जनआशीर्वाद यात्रा ( Janashirwad Yatra) १६ ऑगस्टपासून काढण्यात येणार असून, या यात्रेला माजी मंत्री पंकजा मुंडेंचीही ( Pankaja Munde) उपस्थिती राहणार आहे. ( Janashirwad Yatra of Bhagwat Karad from Gopinath Gad in the presence of Pankaja Munde) 

चार दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे एक बैठक झाली. या बैठकीला औरंगाबादचे स्थानिक पदाधिकारीदेखील गेले होते. त्या बैठकीत जनआशीर्वाद यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात माजी मंत्री पंकजा यांच्या नाराजीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी मुंडे यांना संपर्क करून यात्रेच्या आयोजनाची माहिती दिली. मुंडे या गोपीनाथगडावर यात्रेचे स्वागत करणार आहेत.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच त्यांचे समर्थकदेखील नाराज झाल्याचे बोलले गेले. त्यामुळे डॉ. कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, बीडमधील भाजप पदाधिकाऱ्यांना अद्याप यात्रेच्या नियोजनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे समजते.

असा आहे जनआशीर्वाद यात्रेचा मार्ग१६ ऑगस्ट रोजी परळी आणि गोपीनाथगडावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने नवनिर्वाचित डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याची तयारी केली आहे. १६ रोजी परळी, गोपीनाथगड, गंगाखेड, पालम, लोहा, नांदेड असा यात्रेचा मार्ग असून, दुसऱ्या दिवशी (१७ जुलै) नांदेड, अर्धापूर, कळमनुरी ते हिंगोली मार्गावरून यात्रा जाईल. १८ ऑगस्ट रोजी हिंगोली, जिंतूर आणि परभणी या मतदारसंघांतून १९ रोजी परभणी, मानवत, पाथ्री, सेलू, परतूर, वाटूर ते जालन्यापर्यंत यात्रा येईल. २० रोजी जालना ते बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा ते औरंगाबाद असा यात्रेचा मार्ग आहे. २१ रोजी औरंगाबाद मार्गे दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर ते कन्नडपर्यंत यात्रा जाईल, अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडBhagwat Karadडॉ. भागवतPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा