औरंगाबाद : रेल्वेतून उतरत असताना घसरून पडलेला जपानी पर्यटक दुसºया बाजूने येणाºया रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री पोटूळ येथे घडली.मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेसने प्रवास करणारा ओबे असे नाव असलेला जपानी पर्यटक औरंगाबादला येत होता. ही रेल्वे पोटूळ येथे पोहोचली, तेव्हा औरंगाबाद आल्याचे समजून हा पर्यटक खाली उतरला. बोगीतून उतरत असताना अचानक पाय खाली घसरला आणि दोन रेल्वे रुळाच्या जागेत तो पडला. यावेळी तो उठण्याचा प्रयत्न करीत होता तोच ताशी १०० च्या वेगाने देवगिरी एक्स्प्रेस बाजूच्या रुळावरून रवाना झाली. यावेळी सतर्क झालेल्या या पर्यटकाने काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे रेल्वेखाली येण्यापासून बचावला.हा सगळा प्रकार रेल्वे प्रवासी सेनेचे देवेंद्र तिवारी यांच्या निदर्शनास पडला. ही माहिती त्यांनी रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली. सोमाणी यांनी हा प्रकार स्टेशन मास्तर के. व्ही. पटेल यांना कळविला. पटेल यांनी धाव घेत रेल्वे रुळाच्या परिसरात पाहणी केली. तेव्हा सदर पर्यटक बॅग घेऊन जात असताना दिसला. यावेळी पर्यटकाला पायाला जखम झाली होती. प्राथमिक उपचार करून पर्यटकाला दौंड-नांदेड पॅसेंजरने औरंगाबादकडे रवाना करण्यात आले.मोबाईलद्वारे संवादभाषेच्या अडचणीमुळे पर्यटकासोबत संवाद होण्यास अडचण झाली. तेव्हा पटेल यांनी मोबाईलद्वारे जपानी भाषेचे इंग्रजीत आणि इंग्रजीचे जपानी भाषेत रूपांतर करून संवाद साधून सगळा प्रकार समजून घेतला. यावेळी पर्यटकाला जेवणही देण्यात आले.कॅप्शन..रेल्वे अपघातातून बचावलेला पर्यटक आणि स्टेशन मास्तर.
रेल्वे अपघातातून बचावला जपानी पर्यटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:51 PM
औरंगाबाद : रेल्वेतून उतरत असताना घसरून पडलेला जपानी पर्यटक दुसºया बाजूने येणाºया रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री ...
ठळक मुद्दे पोटूळ येथील घटना : रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला मदतीचा हात अन्् पाहुणचार