मनमिळावू स्वभावाचे असलेले शेख हे १९९४ साली भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. सध्या भूतान येथे हवालदार पदावर ते कार्यरत होते. सुमारे महिनाभरापूर्वीच ते सुटीवर आले होते. येत्या चार महिन्यांत त्यांची निवृत्ती असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव ते करीत होते. मंगळवारी आपले मूळ गाव असलेल्या पळशी बु. येथे येऊन ते आई, भाऊ व नातेवाईकांना भेटून औरंगाबाद येथे घरी गेले. बुधवारी सायंकाळी सात वाजे दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी चार वाजेदरम्यान त्यांचा दफनविधी करण्यात आला. सैन्य दलाच्या जवानांनी शेख शरीफ यांना मानवंदना दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
फोटो :
230921\1841-img-20210923-wa0118.jpg
मयत जवान हवालदार शरीफ शेख