पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होत असलेला विसर्ग व स्थानिक पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात ३२,५९१ क्युसेसने ( Jayakwadi Dam) आवक होत आहे. सोमवारी रात्री ८ वाजता धरणाचा जलसाठा ६० टक्के झाला होता. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात येणारी आवक वाढण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातून वर्तविण्यात आली आहे. अपेक्षित जलसाठा झाल्याने नाथसागरातून सिंचनासह पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्राला नियोजित पाणीपुरवठा केला जाईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. (Jayakwadi Dam @ 60 percent; The inflow to the dam increased by 32,591 cusecs)
गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून दारना ३० मि.मी, वाकी ६० मि.मी, भाम ५६ मि.मी, भावली ९९ मि.मी, गंगापूर ६५ मि.मी, कडवा ३४ मि.मी, वाघाग ३९ मि.मी, घोटी ७० मि.मी, इगतपुरी ९३ मि.मी, त्र्यंबकेश्वर ६० मि.मी अशा पावसाची नोंद झाली आहे. यामुळे काठोकाठ भरत आलेल्या तेथील धरण समूहातील दारणा ७२०० क्युसेस, कडवा २५४४ क्युसेस, गंगापूर ४००० क्युसेस व नांदुर मधमेश्वर वेअरमधून १६५८२ क्युसेसने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय स्थानिक जिल्ह्यातील शिवना, अहमदनगर जिल्ह्यातील भगूर व शेवगाव नद्यांना पूर आल्याने पाणी जायकवाडी धरणात येत असल्याने ३२,५९१ क्युसेस आवक जायकवाडीत होत असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी स्पष्ट केले. सोमवारी रात्री ८ वाजता धरणाचा जलसाठा ६० टक्के तर पाणीपातळी १५१३.७८ फूट होती. एकूण जलसाठा २०३६.१४७ दलघमी (७२टीएमसी) तर उपयुक्त जलसाठा १२९८.०४१ दलघमी (४६ टीएमसी) आहे.
जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणांची टक्केवारीदारणा ९७.३, मुकणे ६६.२५, वाकी ६९.७२, भाम, भावली, वालदेवी आणि आळंदी १००, गंगापूर ९८.२६, गौतमी ८७.२६, कडवा ९९.१७, पालखेड ९४.४९, वाघाड ८६.२३ व पुणेगाव ७२.८७ टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ७७४४ क्युसेस विसर्ग निळवंडे धरणात व निळवंडेतून ८१४४ क्युसेस विसर्ग ओझर वेअरमध्ये होत आहे. ओझर वेअर अद्याप बराच रिकामे असल्याने ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात विसर्ग अद्याप सुरू नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पाणी प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पावसामुळे प्रवरेतून देवगड येथे १०६८ क्युसेसची आवक जायकवाडीसाठी मिळत असल्याचे गणेश खराडकर यांनी सांगितले.
हेही वाचा - - बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच औरंगाबादेत; १६ सप्टेंबरला आयोजन- आधी रेकी केली, तासाभराने कपडे बदलून येत दागिन्यांसह रोकड पळविली