शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 6:54 PM

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो.

पैठण (औरंगाबाद) : धरणात जुलै महिण्यातच ७५% जलसाठा झाला असून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला पाऊस व येणारी आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातून केव्हाही विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा सोमवारी सायंकाळी ४ वाजता. जायकवाडी प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाचा इशारा धडकताच गोदाकाठच्या गावात खळबळ उडाली आहे. 

सोमवारी दुपारी २ वा जायकवाडी धरणाचा जलसाठा ७४% झाला होता. शिवाय धरणात ३६२०६ क्युसेक्स अशी आवक सुरू होती. सोमवारी पाणलोटक्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात येणारी आवक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणातून विसर्ग करावा लागू शकतो अशी शक्यता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जलसाठा ७९% पार गेल्यास होणार विसर्ग.....जायकवाडी धरणात १५ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोणत्या तारखेला किती जलसाठा ठेवावा याचा परिचलन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. दरम्यान या प्रचलन आराखड्या नुसार १५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ७९.११ % पेक्षा जास्त जलसाठा धरणात ठेवता येत नाही. धरणात येणारी आवक लक्षात घेता मंगळवारी धरणाचा जलसाठा ७९% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यानंतर धरणात जीतकी आवक होईल तीतकाच विसर्ग करण्यात येईल अशी शक्यता धरणाचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा ४०३४, कडवा ६४७, वालदेवी २४१, गंगापूर १३७७, आळंदी ४४७, भोजपूर ५४० व नांदूरमधमेश्वर वेअर मधून २८१७० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ८३५, नीळवंडे ८०० व ओझरवेअर बंधाऱ्यातून २१२२ क्युसेक्स क्षमतेने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. सोमवारी जायकवाडी धरणात ३६२०६ क्युसेक्स आवक सुरू होती यात वाढ होणार असल्याने धरणातून विसर्ग करावा लागू शकतो असे अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. 

गोदाकाठच्या गावात धावपळ..सोमवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा  ७५% पेक्षा पुढे सरकला होता. पाणी पातळी १५१७ फूट ईतकी झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  आता फक्त पाच फूट पाण्याची आवक होणे गरजेचे आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १६०५.७८५ दलघमी एवढा झाला आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानंतर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना फटका बसतो. प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिल्यानंतर या गावात मोठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून आले. गोदावरी पात्रात सोडलेल्या मोटारी शेतकरी काढून घेत होते. पात्रालगत असलेले बिऱ्हाड हलविण्यात गावकरी व्यस्त होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस