शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

जायकवाडी धरण ९० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 2:04 PM

आवक घटली; विसर्ग घटविला

ठळक मुद्दे९४ टीएमसी जलसाठाबंधाऱ्यांसाठी सोडण्यात आले पाणी

पैठण (जि. औरंगाबाद): नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडी धरणासाठी होणारा विसर्ग सोमवारी मोठ्या प्रमाणावर घटविण्यात आला. सोमवारी दुपारनंतर धरणात येणारी आवक सातत्याने घटत होती. मंगळवारी धरणात येणारी आवक अत्यंत कमी होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. यामुळे तूर्त जायकवाडी धरणातूनपाणी सोडण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. मंगळवारी सकाळी  ७ वाजता धरणाचा जलसाठा ९०.२३ टक्के झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी होणारा विसर्ग सोमवारी दुपारनंतर नगण्य करण्यात आला. मुळा धरणातून २००० क्युसेक, भंडारदरा १००० क्युसेक, निळवंडे ७०० क्युसेक असा मिळून ओझर वेअरमधून ४००० क्युसेकचा विसर्ग प्रवरेच्या पात्रात सुरू होता, होणारा विसर्ग लक्षात घेता प्रवरेतून मंगळवारी जायकवाडी धरणात येणारी आवक नगण्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होणारा विसर्गसुद्धा आज कमी करण्यात आला. 

( 'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा) 

दारणा धरणातून २५३८ क्युसेक, गंगापूर ७५८  क्युसेक व पालखेडमधून ३८०५ क्युसेक असा मिळून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून १२८०६ असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू होता. या धरणातील विसर्ग तेथे पाऊस नसल्याने अत्यंत कमी करण्यात येणार असल्याने मंगळवारी गोदापात्रातून जायकवाडीसाठी येणारे पाणी कमी होणार आहे.

नाशिक, नगर जिल्ह्यात पाऊस उघडल्याने तेथील धरणांतून विसर्ग अत्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे धरणात येणारी आवक नगण्य राहणार असून, जायकवाडी धरण आणखी १२ टक्के भरणे बाकी असल्याने तूर्त धरणातून विसर्ग करण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे जायकवाडीचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

९४ टीएमसी जलसाठा१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी सोमवारी १५१९.८७ फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी २.१९ फूट बाकी आहे. जायकवाडी धरणात सोमवारी सायंकाळी ३३९२६ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. धरणाचा एकूण जलसाठा २६६०.२४६ (९३.९३ टीएमसी) इतका झाला असून, यापैकी १९२२.१४० (६७.८७ टीएमसी) जिवंत जलसाठा आहे.

( परळी औष्णिक केंद्रासाठी जायकवाडीचे पाणी सोडले )

बंधाऱ्यांसाठी सोडण्यात आले पाणीजायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक क्षमतेने परळी औष्णिक कें द्रासाठी पाणी सोडले. उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेक क्षमतेने माजलगाव धरणासाठी पाणी पाणी सोडले. सोमवारी  जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून पैठणमधील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी १५९० क्युसेक क्षमतेने पाणी सोडले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद