शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

जायकवाडी तुडुंब, आवक वाढल्याने १८ दरवाजे उघडले; तब्बल ९ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 4:04 PM

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

पैठण : येथील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने सोमवारी दुपारी १२:३० आणि सायंकाळी ७ आणि मंगळवारी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास उघडण्यात आले असून, त्यामधून ९ हजार ४३२ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आवक वाढल्याने सोमवारी दिवसभरात एकूण १२ दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडण्यात आली होती. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळी आणखी ६ दरवाजे अर्ध्या फूट उंचीने उघडून विसर्ग वाढविण्यात आला. धरणात होणारी आवक लक्षात घेत विसर्ग आणखी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. सोमवारी जायकवाडी धरणात वरच्या धरणातून १० हजार ७४६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ९७.६९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिगंबर रायबोले, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, नामदेव खराद, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खरडकर, गणेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून धरणाचे गेट क्रमांक १०, २७, १८, १९, १६ व २१ असे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ३ हजार १४४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

आवक वाढल्याने एकूण १८ दरवाजे उघडलेसोमवारी पुन्हा धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजता धरणाचे १४, २३, १२, २५, ११ व २६ असे आणखी ६ असे एकूण १२ दरवाजे उघडून नदीपात्रातून एकूण ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११. ३० ते १२ वाजेदरम्यान धरणाचे १३, २४, १५, २२, १७ आणि २० असे एकूण १८ दरवाजे अर्ध्या फुट उंचीने उघडून ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यानंतरही धरणात पाण्याची आवक वाढल्यास गोदावरी पात्रात विसर्ग वाढवण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव म्हणाले.

धरणाच्या खालील ६ बंधारे भरलेधरणाची पाणी पातळी १५२१.५८ फूट आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २८५०.८८८ दलघमी असून, उजव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा गेल्या काही दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीवर पैठण ते नांदेड दरम्यान १८ बंधारे आहेत. यापैकी सहाही बंधारे भरले असल्यामुळे या बंधाऱ्यांद्वारे हे पाणी सरळ नांदेडकडे निघाले आहे. १९७६ पासून आतापर्यंत जायकवाडी धरण १४ वेळेस शंभर टक्के भरले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी