शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 5:21 PM

आवक वाढल्याने गोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेश

पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी धरणाची पाणी पातळी ६५.६१ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. धरणात ७७ हजार ५७९ क्युसेकने पाण्याची आवक होत असून मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

मागील वर्षी धरण केवळ ५५ टक्के भरले होते. मात्र, यावर्षी ऑगस्ट महिन्यातच या धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आणखी एक महिना पावसाळा आहे. यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूरमधून ५२० क्युसेक, भावली ४८१, भाम २ हजार ९९०, वालदेवी १८३, वाकी ८५३, कडवा ३ हजार २९२, आळंदी २४३, नांदूर मधमेश्वर ३९ हजार १६९, भोजापूर ९१०, होळकर ब्रीज २ हजार २१, पालखेड ३ हजार ९०८, वाघाड २ हजार २७५, तिसगाव ३२२, पुणेगाव १ हजार ३०० आणि ओझरखेड धरणातून १ हजार ३२० क्युसेक पाणी हे नागमठाण धरणात येत आहे. तेथून त्याचा गोदावरी पात्रात विसर्ग केला जात आहे.

नगर जिल्ह्यातील धरणातून असे येते पाणीनगर विभागातील भंडारदरा ६ हजार ९५०, निळवंडे ८ हजार ७४४, मुळा १० हजार, ओझर वेअर ९ हजार ७६९, आडाळा ७८ आणि मजमेश्वर केटीवेअरमधून ३ हजार ६०० क्युसेक पाणी देवगड बंधारा येथे आल्यानंतर ते गोदावरी नदीत सोडले जात आहे. तेथून हे पाणी जायकवाडी धरणात येते.

यापूर्वी असे भरले होते धरण१९७५ पासून धरण शंभर टक्के बारा वेळेस, ५० टक्क्यांच्या पुढे १६ वेळेस आणि २००५ ते २००८ हे तीन वर्षे शंभर टक्के धरण भरले होते. त्यानंतर २०१८ ते २०२२ हे सलग तीन वर्षे धरण शंभर टक्के भरले होते.

वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेशगोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील बाबतरा, डोणगाव, नांदूरढोक, लाखगंगा, पुरणगाव, बाभुळगावगंगा, सावखेडगंगा, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, बाजाठाण, चेंडूफळ, भालगाव, चांदेगाव, डागपिंपळगाव, शनिदेवगाव व वांजरगाव या १७ गावांना महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद