शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जायकवाडी धरण अर्धे भरले!; ४० वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:00 PM

धरणाच्या जलसाठ्यात दर तासाला एक टक्क्याने भर पडली

ठळक मुद्दे२,३५,१९५ क्युसेक क्षमतेने आवक नांदूर-मधमेश्वरसह भंडारदराचेही पाणी दाखल 

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणात मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक  होत असल्याने गेल्या १२ तासांत जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात तब्बल १३.२५ टीएमसीने भर पडली आहे. १२ तासांच्या कालावधीत १३.२५ टीएमसीची झालेली वाढ हा एक विक्रम असून, गेल्या ४० वर्षांत अशी विक्रमी वाढ झालेली नाही. सोमवारी सायंकाळी ७ वाजता धरणात उपयुक्त जलसाठा १९.८८ टीएमसी एवढा होता. मंगळवारी सायंकाळी ७ वा. उपयुक्त जलसाठा  ३३.१३ टीएमसी झाला होता. २८ जुलै रोजी धरणाचा जलसाठा (उणे १०.४३%) एवढा होता. मंगळवारी ५0% झाला आहे. २८ जुलै ते ८ आॅगस्ट १0 दिवसांत जलसाठ्यात ५४.४३% वाढ झाली हाही  विक्रमच आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

नांदूर-मधमेश्वर धरणातून ४ आॅगस्ट रोजी सोडण्यात आलेला २,९४,००० क्युसेकचा महत्तम विसर्ग मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणात २,३५,१९५ क्युसेक क्षमतेने दाखल झाला. सोबतच भंडारदरा धरणातून सोडलेले पाणीही सकाळी नाथसागरात दाखल झाल्याने आज दुपारनंतर जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात दर तासाला एक टक्क्याने भर पडत होती. सायंकाळी ६ वा. धरणाचा जलसाठा ४४ टक्क्यांहून अधिक झाला होता. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर मंदावल्याने आज तेथील धरणांतून होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणावर घटविण्यात आला. मंगळवारी दारणा १३२४, गंगापूर ८९७३, करंजवन ३५५०, पालखेड १५९६६, कडवा ३०३८ व वालदेवी धरणातून ४१७७ क्युसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला होता. नांदूर-मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग मंगळवारी दुपारी ३ वाजता ६६२९६ क्युसेकपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, सोडलेले पाणी पात्रातच समाविष्ट होत असल्याने पूरग्रस्त भागाला दिलासा मिळाला आहे.

४ आॅगस्ट रोजी नांदूर-मधमेश्वर धरणातून सोडलेला महत्तम विसर्ग मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला. नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेला हा विसर्ग सोमवारी सायंकाळच्या सुमारास धरणात दाखल होईल, अशी अपेक्षा जायकवाडी प्रशासनास होती. मात्र, प्रत्यक्षात हा विसर्ग जायकवाडीस तब्बल १० तास उशिरा मिळाल्याने जायकवाडीचे अभियंता याबाबत वास्तविक परिस्थितीचा आढावा घेत होते.    सकाळी ७ वाजता धरणात १४८६३३ क्युसेकने आवक सुरू होती. दुपारी १२ वाजता १६१७०१ क्युसेक, तर दुपारी २ वाजता २,०५,७९६ क्युसेक आवक झाली. सायंकाळी ४ वाजता आवक आणखी वाढून ती २,४९,९०० क्युसेक एवढी झाली यामुळे धरणातील जलसाठ्यात गतीने वाढ झाली.दरम्यान, जायकवाडी धरणात येणारी २,३५,१९५ क्युसेकची आवक लक्षात घेता जायकवाडी धरणाचा जलसाठा मंगळवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान ५०% होईल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले, तसेच गोदावरी पात्रात होणारा विसर्ग जवळपास २ लाख क्युसेकने कमी झाल्याने गोदावरीचा महापूर कमी होणार आहे. जायकवाडी धरणातील आवक लक्षात घेता दरतासाला पाणीपातळीत १% भर पडत असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता संदीप राठोड, धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, आर.ई. चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधणे, आदींनी सांगितले.

निळवंडेचा विसर्ग दाखलअहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९५.०४% व निळवंडे धरण ८७.३२% भरले आहे. त्यातच गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२५ मि.मी. पावसाची सोमवारी नोंद झाल्याने भंडारदरा धरणातून सोमवारपासून विसर्ग करण्यात येत आहे. मंगळवारी भंडारदरा धरणातून ३४,०६० क्युसेक विसर्ग निळवंडेत करण्यात येत होता. निळवंडेतून ओझरवेअरमध्ये ९,१८० क्युसेक व ओझरवेअरमधून प्रवरेच्या पात्रात १७,१८८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी सकाळी ९ वाजता प्रवरासंगम येथे येऊन गोदावरीला मिळाले.

दर तासाला टक्क्याची भरगोदावरीच्या महापुराचे पाणी मोठ्या क्षमतेने आज जायकवाडीत दाखल झाल्याने जलसाठ्यात दरतासाला १ टक्क्याने भर पडत होती. सायंकाळी ६ वा धरणात २,२०,५०० क्युसेक, अशी आवक होत होती. १,५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी ६ वा १,५०९.७७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १,६७६.३९४ दलघमी ( ५९.१९ टीएमसी) झाला होता. यापैकी ९३८.२८८ दलघमी (३३.१३ टीएमसी) जिवंत साठा आहे. 

निळवंडेचा विसर्ग दाखलअहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९५.०४% व निळवंडे धरण ८७.३२% भरले आहे. त्यातच गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२५ मि.मी. पावसाची सोमवारी नोंद झाल्याने भंडारदरा धरणातून सोमवारपासून विसर्ग करण्यात येत आहे. मंगळवारी भंडारदरा धरणातून ३४,०६० क्युसेक विसर्ग निळवंडेत करण्यात येत होता. निळवंडेतून ओझरवेअरमध्ये ९,१८० क्युसेक व ओझरवेअरमधून प्रवरेच्या पात्रात १७,१८८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी सकाळी ९ वाजता प्रवरासंगम येथे येऊन गोदावरीला मिळाले.

जलसाठ्यात मंगळवारी अशी वाढ झालीसकाळी ११     ३६.३५%दुपारी १२     ३७.११%दुपारी १     ३७.८७%दुपारी २     ३८.८७%दुपारी ४     ४१.०८%संध्या. ५      ४२.१८%संध्या. ६    ४३.२२%रात्री  ७    ४४.१३%रात्री  ८    ४५.0५%रात्री  ९    ४५.९७%रात्री  १0    ४६.८९%रात्री ११    ४७.७९%रात्री १२    ४८.७९%रात्री १    ४९.५५%रात्री २    ५०.५०%

नांदूर-मधमेश्वरचा विसर्ग असा घटविलासकाळी १० वा  -     १,००,२८९ क्युसेकसकाळी ११ वा  -      १,००,२८९ क्युसेकदुपारी    १२ वा  -     १,००,००० क्युसेकदुपारी    ०१ वा   -    ९५,०९२ क्युसेकदुपारी    ०२ वा   -    ७०,९६२ क्युसेकदुपारी    ०३ वा   -     ६६,२९६ क्युसेक

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरWaterपाणीAurangabadऔरंगाबाद