औरंगाबाद : जालना येथील टोल कंपनीत जमा होणारी रोकड बँकेत जमा करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे आदी काम करणा-या कर्मचाºयांच्या जीपची काच फोडून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड असलेली बॅग लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २. ४० वाजेच्या सुमारास पाटीदार भवनजवळील एका बँकेसमोर घडली. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, जालना येथील टोलनाका चालविणाºया कंपनीचे कर्मचारी दिनेश अशोकराव रिंडे हे शुक्रवारी कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळील बॅगमध्ये दीड लाखाची रोकड होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास ते जालना रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेत गेले. त्यानंतर ते त्यांची जीप घेऊन पाटीदार भवनजवळील दी जळगाव पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँकेसमोर गेले.
बँकेसमोर त्यांनी त्यांची जीप उभी केली. दीड लाखाची रोकड असलेली बॅग त्यांनी समोरच्या सीटजवळ ठेवली आणि जीप लॉक करून ते बँकेत गेले. दुपारी २.४० वाजेच्या सुमारास ते बँकेतून परत आले तेव्हा त्यांना जीपचालकाच्या बाजूची काच फोडून जीपमधील दीड लाख रुपये असलेली बॅग पळविल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांनी लगेच जवाहरनगर पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक एस.एन. इंगळे आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला.
चोरटे सीसीटीव्हीत कैदवाहनाची काच फोडून पैशाची बॅग पळविणाºया एका टोळीतील बहीण-भावाला गुन्हे शाखेने मुंबईतून पकडून आणले, तेव्हा पोलीस तपासात अशा प्रकारच्या चोºया करणारे अनेक लोक राज्यात फिरतीवर असतात, असे समोर आले. यापूर्वीच्या घटनांप्रमाणे दुचाकीस्वार चोरटे दिनेश यांच्या जीपची काच फोडून बॅग पळविताना सीसीटीव्हीत कैद झाले. शिवाय अन्य काही संशयित लोक त्यावेळी तेथे उभे असल्याचे पोलिसांना दिसले.