कन्नड : कुपोषणमुक्त मराठवाड्याची सुरुवात ज्या जेहूरपासून माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी केली त्याच गावात दोन जुळी बालके कुपोषित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही बालके उपचारापासून वंचित राहिल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.शामल नवनाथ पवार (वय ८ महिने), उंची ५७ सें.मी., वजन ४ किलो ६०० ग्राम, तर रोशन नवनाथ पवार (वय ८ महिने) उंची ५७ सें.मी., वजन ४ किले ७०० ग्राम अशी गंभीर कुपोषित झालेल्या मुलांची नावे आहेत. या बालकांची प्रकृती उपचारावाचून अंत्यत नाजूक झाल्याचे गावातील नागरिक बाळू पवार यांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. शामल पवार हिला रक्ताची लघवी होत आहे, तर रोशन पवार हा कुपोषणामुळे अशक्त झाला आहे. सध्या त्यांना गोवर निघालेला असल्याने गंभीर अवस्थेत आहे. या दोन्ही बालकांना सोमवारी उपचारासाठी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जेहूर येथे कुपोषणामुळे दोन बालके गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:28 AM