नांदेड : प्रेमाच्या विविध कसोट्यांना सामोरे जात कलर्स वाहिनी आणि लोकमत सखीमंच आयोजित ‘जोडी जन्मोजन्माची कसम प्रेमाची’ ही स्पर्धा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली़कार्यक्रमाची सुरुवात पूजा वाघमारे यांच्या गणेशवंदनेने झाली़ कलर्स वाहिनी व लोकमत सखीमंचने प्रेम हा विषय घेवून ‘जोडी जन्मोजन्माची कसम प्रेमाची’ या धमाल स्पर्धेचे आयोजन केले होते़ ही स्पर्धा बुधवारी शंकरराव चव्हाण सभागृहात पार पडली़ या कार्यक्रमात संगीत, काव्य, अभियन अशा फेऱ्या घेण्यात आल्या़ पुनर्जन्म या विषयावर प्रेमाचे सादरीकरण स्पर्धकांना करायचे होते़ गाता गळा नसतानाही जोडप्यांनी गाण्याचे उत्तम सादरीकरण करत प्रेक्षक सखींची वाहवा मिळवली़ प्रेक्षकांसाठी घेण्यात आलेल्या बॉलीवूड जोडी स्पर्धेने कार्यक्रमात रंगत भरली़ अगदी मुमताज, राजेश खन्ना यांच्या चित्रपटापासून ते आतापर्यंतच्या बॉलीवूड जोड्यांचे पोशाख धारण करुन सखींनी बॉलीवूड जोडी वेशभूषा परिधान करुन रॅम्प वॉक केला़ स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रमोद देशपांडे, मंजुषा देशपांडे, संगीता धानीवाला हे होते़ कार्यक्रमात लय परफॉर्मिंग आर्टस् ग्रुपच्यावतीने प्रेमावरील गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले़ सूत्रसंचालन प्रिया इंगळे व डॉ़विद्या पाटील यांनी केले़ कलर्स वाहिनीने नेहमीच वेगळ्या विषयांवर मालिकेतून प्रकाशझोत टाकत असते़ नि:स्सीम प्रेमावर आधारित कसम नावाची मालिका ७ मार्चपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे़ कसम ही मालिका ऋषी आणि तनुश्री या दोन प्रेम करणाऱ्यांची असून त्यांच्या प्रेमाच्या वाटेत आलेल्या अनेक सुख दु:खाचे क्षण पे्रक्षकांना अनुभवता येणार आहे़ शिवाय त्यांच्या प्रेमासाठी घ्याव्या लागलेल्या पुनर्जन्माची कथा ही आपल्याला अनुभवता येणार आहे़ अशा या प्रेमाने परिपूर्ण असलेल्या 'कसम' मालिकेच्या विषयाला अनुसरून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते़ जोडी जन्मोजन्माची, कसम प्रेमाची हा कलर्स आणि लोकमत सखीमंच आयोजित कार्यक्रम तुम्हाला प्रेमाच्या वेगळ्या जगात घेवून जाईल, यात शंका नाही़ विजेत्यांची नावे : बेस्ट साँग १) सुचिता आणि सचिन खेडकर २) प्रसन्नता आणि शरद जोशी३) अर्चना आणि संजय वाघमारेबॉलीवूड जोडी१) नयना गिरगावकर आणि मोना जोगी२) मनीषा पंगीलवार आणि सुनीता शिंदे३) उषा शर्मा आणि सुरेखा धामणकर
कलर्स वाहिनी व सखीमंच आयोजित जोडी जन्मोजन्माची कसम पे्रमाची पती-पत्नीला मिळाला प्रेमाचा पुरस्कार
By admin | Published: March 13, 2016 2:32 PM