शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जॉन्सन, आय.आय.ए. उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:52 AM

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सन संघाने बजाज आॅटोवर, तर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक (आयआयए) संघाने जिल्हा वकील वरिष्ठ संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात विजय ढेकळे व रजा कुरेशी सामनावीर ठरले. शुभम हरकळनेही अर्धशतक ठोकत आपला ठसा उमटवला.

ठळक मुद्देशुभमचे अर्धशतक : विजय ढेकळे, रजा कुरेशी सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सन संघाने बजाज आॅटोवर, तर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक (आयआयए) संघाने जिल्हा वकील वरिष्ठ संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात विजय ढेकळे व रजा कुरेशी सामनावीर ठरले. शुभम हरकळनेही अर्धशतक ठोकत आपला ठसा उमटवला.पहिल्या सामन्यात बजाज आॅटोने २0 षटकांत ९ बाद ८४ धावा केल्या. त्यांच्याकडून राजा चांदेकरने १३ व नवनाथ कुबेरने ११ धावा केल्या. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनतर्फे विजय ढेकळेने ६ धावांत ३ व सचिन सबनीस, रणजित वुके यांनी प्रत्येकी २, तर अनिरुद्ध पुजारीने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सनने विजयी लक्ष्य ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून स्वप्नील खडसेने १६ चेंडूंत ७ चौकारांसह ३१, प्रवीण क्षीरसागरने २१ धावा केल्या. बजाजकडून राजा चांदेकर, अली बकोदा, रियाज जहागीरदार, तितिक्ष बियाणी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात आयआयएने २0 षटकांत ७ बाद १६१ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळने ४९ चेंडूंत ८ चौकारांसह ५७, अमोल खरातने २६ चेंडूंत २ चौकार ३ षटकारांसह ४२, अमोल पवारने २ चौकार व एका षटकारासह २८ व युसूफ शेखने १४ धावा केल्या. जिल्हा वकील वरिष्ठ संघाकडून खालीद सिद्दीकीने २८ धावांत २, तर अभिलेष पवार, दीपक मनोरकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ १३१ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून कर्णधार उदय पांडेने एकाकी झुंज देत ३३ चेंडूंत २ षटकार व ६ चौकारांसह ५६, दीपक मनोरकरने २४ व खालीद सिद्दीकीने १४ धावा केल्या. आय.आय.ए.कडून रजा कुरेशीने १४ धावांत ५ गडी बाद केले. सुनील भालेने १२ धावांत ४ व समीर यादवने १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात महेश सावंत, विष्णू बब्बीरवाल यांनी काम पाहिले. गुणलेखन तन्मय ढगेने केले.उद्या, ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३0 वा. शहर पोलीस ब वि. मनपा, सकाळी ११ वा. बडवे इंजिनिअरिंग वि. स्कोडा आॅटो व दुपारी २.१५ वा. एआयटीजी व वैद्यकीय प्रतिनिधी क यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार असल्याचे संयोजक गंगाधर शेवाळे व दामोदार मानकापे यांनी कळवले.

टॅग्स :CrackersफटाकेTwenty20 cricketटी-२० क्रिकेट