शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

निवडणुकीत तोतया अधिकाऱ्यांची उडी; पोलिस सायरनच्या गाड्यात फिरून दारू, जेवणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 19:38 IST

निवडणुकीचे काम करतोय, अज्ञातांकडून दादागिरी, पोलिसांचा सायरन वाजवत फिरतात आलिशान गाड्या

छत्रपती संभाजीनगर : आम्ही आचारसंहितेचे काम करत आहोत, तपासणी करतोय, असे सांगत आलिशान कारमधून आलेल्या अज्ञातांकडून शासकीय पथकाच्या नावाखाली धाकदपटशा सुरू आहे. मंगळवारी रात्री शरणापूर फाट्याजवळील एका बारमध्ये अशाच एका कारमधील दोघे वाद घालताना सीसीटीव्ही फुटेजध्ये कैद झाल्यानंतर ही घटना समोर आली.

शरणापूर फाट्याजवळ एका हॉटेल व्यावसायिकाने रात्री बार बंद केला होता. कामगार आवराआवर करत होते. तेव्हा १२:३० वाजता पांढऱ्या रंगाची गाडी आली. पोलिस वाहनासारखा सायरन वाजवून हॉटेल चालकाला बाहेर बाेलावले. गाडीतील दोघांपैकी एकाने त्यांना कारमध्ये दारू देण्याचे आदेश दिले. चालकाने बार बंद केल्याचे सांगितले. तेव्हा, ‘आम्ही निवडणुकीचे काम करतोय, एसीबीचे कर्मचारी आहोत’, असे म्हणत दंडेलशाही केली. त्यानंतर त्यांनी काहींना कॉल करून बारचालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. बारचालकाने दारू देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर ‘उद्या तुझे हॉटेल बंद करतो’, अशी धमकी देत ते दौलताबादच्या दिशेने रवाना झाले.

कॉल लावून दबावपांढऱ्या रंगाच्या कारला असलेल्या एमएच २० फॅन्सी नंबर प्लेटवर पहिला आकडा सूक्ष्म स्वरूपात, तर खाली मोठ्या आकारात ३१३ क्रमांक होता. समोर पोलिस, अशी पाटी लावून पोलिसांच्या वाहनासारखा सायरन देखील ते वाजवत फिरत होते. त्यातील एकाने स्वत:ला लाचलुचपत विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगत दबाव टाकला. रात्री १० वाजता शहानूरमियाँ दर्गा परिसरात देखील महाराष्ट्र शासन लिहिलेले खासगी वाहन जोरजोरात सायरन वाजवत गेले. केंब्रिज चाैक परिसरातही असे वाहन फिरत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

तपासणीचा मंडप रिकामाआचारंसहितेमुळे शहरात ठिकठिकाणी पत्र्यांचे शेड उभारून तपासणीसाठी पथक तैनात केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह शहराच्या प्रवेश मार्गांवर हे पथक २४ तास तैनात असते. मात्र, पडेगाव, दौलताबाद रस्त्यावर उभारलेले शेड काही दिवसांपासून रिकामेच असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकCrime Newsगुन्हेगारी