शहरं
Join us  
Trending Stories
1
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
2
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
3
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
4
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
5
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
6
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
7
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
8
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
9
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
10
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
11
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
12
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
13
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
14
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
15
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
16
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
17
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
18
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका
19
ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे
20
दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं; कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

पोहता येत नसताना हर्सूल तलावात उडी घेतली; वाचवा वाचवा, आवाज ऐकून सुरक्षा रक्षक धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 4:51 PM

बुडणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी साडीच्या मदतीने बाहेर काढले

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलाव तुडुंब भरत आला आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून अनेक तरुण पोहण्यासाठी येत आहेत. रविवारी दुपारी ३ वाजता एका तरुणाने पोहण्यासाठी तलावात उडी मारली. त्याला पोहता येत नव्हते. त्याने वाचवा वाचवा, अशी ओरड सुरू केली. तेव्हा तलावावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला साडीच्या साह्याने वाचविले.

हर्सूल तलावाची पाणीपातळी २६ फुटांवर पोहोचली आहे. तलाव भरण्यासाठी आता फक्त दोन फूट पाण्याची गरज आहे. रविवारी दुपारी आकाश चौहान या तरुणाने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तलावात उडी घेतली. पोहता येत नसल्याने त्याने ओरड सुरू केली. सुरक्षा रक्षक कैलास वाणी, भालसिंग कणसे, राजेंद्र गवळी, विनोद बनकर आणि जयसिंग हरणे यांनी धाव घेतली. जवळच पडलेल्या एका साडीला दगड बांधून आकाशच्या दिशेने फेकली. आकाशने साडी पडकली. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढले. भेदरलेल्या आकाशला धीर देत त्याच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या हवाली केले.

आत्महत्येसाठी तलावावर आला तरुणरविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आणखी एक तरुण तलावाच्या काठावर बसून रडत होता. आत्महत्या करण्यासाठी तो तलावावर आला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याच्याजवळ जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याने प्रांजळपणे कबुली दिली की, मी आत्महत्या करण्यासाठी आलो. सुरक्षा रक्षकांनी त्याची समजूत काढली. तरुणाच्या मेहुण्याला बोलावून त्याच्या हवाली केले. श्रीराम सूर्यभान जाधव, असे या तरुणाचे नाव असून, तो हडको एन-११ भागात राहतो, असे सुरक्षा रक्षकांनी सांगितले.

सुरक्षा रक्षकांना हवे विविध साहित्यहर्सूल तलावात दरवर्षी आठ ते दहा जण आत्महत्या करतात. काही तरुण पोहताना बुडून मरण पावतात. सुरक्षा रक्षक हे दृश्य पाहूनही अनेकदा काहीच करू शकत नाहीत. या ठिकाणी उत्तम पोहणाऱ्या काही सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बोट, दोरी आदी साहित्य मनपाने दिले पाहिजे, असे या भागातील नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhersul lakeहर्सूल तलाव