औरंगाबाद : जालना रोडवरील बहुचर्चित महावीर चौक, रेल्वेस्टेशन रोड आणि वसंतराव नाईक चौक, सिडको हे दोन्ही उड्डाणपूल २० जून रोजी सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली. अडीच वर्षांपासून त्या पुलांचे काम सुरू आहे. महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम झाले असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाचे काम अजून बाकी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आणि मनपात भूसंपादनावरून सध्या पत्रव्यवहार सुरू आहे. सिडकोतील उड्डाणपुलाची लांबी वाढण्याच्या वादामुळे ते काम रखडले. त्यानंतर मंजूर आराखड्याइतकेच काम करण्याचे ठरल्यानंतर पुलाचे काम लगबगीने पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे सध्यातरी पुलाच्या बांधणीवरून वाटत नाही. अतिशय किचकट अशा स्वरूपाची वाहतूक व्यवस्था सध्या नाईक चौकात पाहण्यास मिळते. २० जून रोजी सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाप्रसंगी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.
२० जूनला दोन्ही उड्डाणपूल होणार खुले
By admin | Published: June 15, 2016 11:49 PM