लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या (जुक्टा) वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा नेण्यातआला.हा मोर्चा दुपारी औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निघाला. सुरुवातीला काही अंतरापर्यंत मोर्चात शिक्षकांची संख्या बºयापैकी होती. थोडे अंतर चालून गेल्यानंतर जवळपास अर्ध्याहून अधिक शिक्षक वाहनांद्वारे शिक्षण उपसंचालक कार्यालयात गेले. तेथे जुक्टाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र पगारे, सचिव प्रा. संभाजी कमानदार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालकांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आॅनलाईन संचमान्यतेतील सर्व त्रुटी दूर कराव्यात व यापुढे प्रचलित निकषानुसारच संच मान्यता करण्यात यावी, सन २०१२- १३ पासून शिक्षकांना वेतन व मान्यता देण्यात याव्यात, शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना त्वरित सेवा सातत्य देण्यात यावे, माहिती तंत्रज्ञान हा विषय अनिवार्य व अनुदानित करावा, तसेच हा विषय शिकविणाºया शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन दिले जावे, कायम विना अनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालये त्वरित अनुदानावर आणावीत, अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या तीन फेºया अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयासाठी घ्याव्यात, १४ वर्षे सलग सेवा पूर्ण करणाºया कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सरकारी कर्मचाºयांप्रमाणे निवडश्रेणी लागू करावी, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र प्रशासन यंत्रणा स्थापन करण्यात यावी, या व इतर मागण्यांचा समावेशहोता.शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबादेत ‘ज्युनिअर कॉलेज’ शिक्षकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:05 AM
जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या (जुक्टा) वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा नेण्यात
ठळक मुद्देजुक्टा : शिक्षण उपसंचालकांना विविध मागण्यांचे निवेदन सादर