शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

बस चालकास गजाने मारहाण

By admin | Published: April 30, 2017 12:18 AM

बदनापूर : एसटी बसला अडवून बस चालक, वाहकाला मारहाण करून तीन हजार आठशे रूपये बळजबरीने नेल्याप्रकरणी दहा आरोंपीविरूध्द बदनापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बदनापूर : तालुक्यातील राजूर-औरंगाबाद मार्गावर एसटी बसला अडवून बस चालक, वाहकाला मारहाण करून तीन हजार आठशे रूपये बळजबरीने नेल्याप्रकरणी दहा आरोंपीविरूध्द बदनापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.२९ एप्रिल रोजी औरंगाबादहून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एसटी (एमएच-२० बीएल २२८७) औरंगाबाद-राजूर ही बस राजूरकडे जात असताना एक प्रवासी टाकळी येथून या बसमधे बसला. हा प्रवासी दारात उभा असल्यामुळे चालकाने त्या प्रवाशाला बसमधे मागे बसण्यास सांगितले. त्यावरून त्याने चालकास शिवीगाळ केली. त्यानंतर तो प्रवासी तळेगाव येथे उतरला त्यानंतर बस राजूरला गेली व राजूरहून परत औरंगाबादकडे निघाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही बस सुंदरवाडी ता. बदनापूर येथे आली असता एक बैलगाडी ढकलून बस आडविण्याचा प्रयत्न झाला. चालकाने बसवर नियंत्रण मिळवून बस थांबविली. त्यानंतर चार ते पाच मोटारसायकलवर पाठलाग करीत आलेल्या दहा ते पंधरा इसम बसजवळ आले काहींनी बस चालकाला खाली उतरविले व बसमधील लोखंडी गजाने डोक्यात व हातावर मारहाण केली. चालकाच्या डोक्यास व हातास दुखापत झाली. वाहकालाही मारहाण करण्यात आली. बसवर दगडफेक केली त्यामधे बसच्या काही काचा फुटल्या तसेच वाहकाजवळील ३८२१ रूपये बळजबरीने हिसकावून घेतली सदर आशयाची फिर्याद बसचालक जीवनसिंग प्रेमसिंग मंडावत औरंगाबाद डेपो रा औरंगाबाद यांनी दिल्यावरून ज्ञानदेव साहेबराव खरात, अण्णा किसन दानवे, संतोष साहेबराव कान्हेरे, निवृत्ती साहेबराव कान्हेरे व इतर ६ ते ७ जणांविरूद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.