औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडू ज्योती मुकाडे व मयुरी पवार यांची दिल्ली येथे होणाºया खेलो इंडिया खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धर्मवीर संभाजी विद्यालयात शिकणाºया ज्योती मुकाडे व मयुरी पवार यांची बालेवाडी येथे झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी झालेल्या चाचणीतून निवड झाली आहे. या निवडीबद्दल धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सचिव शामसुंदर नाईक, डॉ. सर्जेराव ठोंबरे, अशोक मोरे, स्मिता खोतकर, शिवदास गिरे, मुख्याध्यापक अशोक मोरे, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, सचिव गोविंद शर्मा, प्रशिक्षक संजय मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, गोकुळ तांदळे, चंद्रशेखर घुगे, क्रीडा शिक्षक विनायक राऊत, अविनाश शेंगुळे यांनी ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्योती, मयुरी यांची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:22 AM