औरंगाबाद : महात्मा गांधी मिशनच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयेजित हेरिटेज आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू परभणीची ज्योती गवते आणि नितीन तालिकोटे यांनी जिंकली. हेरिटेज रनमध्ये जवळपास १५०० धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.३५ वर्षांखालील महिलांच्या १२ कि.मी. रनमध्ये महिला गटात प्रथम क्रमांक मिळवला, तर पुरुष गटात नितीन तालिकोटे अव्वल ठरला.निकाल (१३ ते ३५ वर्षांखालील पुरुष गट- १२ कि.मी.) : १. नितीन तालिकोटे, २. कल्याण ढगे, ३. गजानन ढोले, ४. शेकू वाघ, ५. विशाल भोसले. १४ ते १६ वयोगट (५ कि.मी.) : १. विनय ढोबळे, २. किरण म्हात्रे, ३. सेवालाल राठोड, ४. आकाश शिंदे, ५. शुभम चालक. ३६ ते ४५ (५ कि.मी.) : १. ज्ञानेश्वर कुलथे, २. संतोष वाघ, ३. राम लिंभारे, ४. भगवान इंदोरे, ५. कैलास गाडेकर. ४६ ते ५५ वयोगट (३ कि.मी.) : १. भगवान कच्छवे, २. विजय शिंपी, ३. दिनकर सानप, ४. शकील खान, ५. काशीनाथ दुधे. ५६ वर्षांवरील (२ कि.मी.) : १. लक्ष्मण शिंदे, २. मोहंमद शेख, ३. अवदेश पाठक, ४. पंढरीनाथ गायकवाड, ५. भीमराव खैरे. महिला गट (१४ ते १६ : ५ कि.मी.) : १. सूचिता मोरे, २. संध्याराणी सावंत, ३. कांचन म्हात्रे, ४. निकिता म्हात्रे, ५. धनश्री माने. १७ ते ३५ वयोगट : (१२ कि.मी.) १. ज्योती गवते, २. भारती दुधे, ३. आरती दुधे, ४. सोनाली पवार, ५. सुलभा भिकाने. ३६ ते ४५ वयोगट (३ कि.मी.) : १. तबस्सूम शेख, २. मीरा गायकवाड, ३. अनुराधा कच्छवे, ४. सोनम शर्मा, ५. दीपा पाठक. ४६ ते ५५ वयोगट (२ कि. मी.) : १. माधुरी निमजे, २. भारती कल्याणकर, ३. सुषमा राखुंडे, ४. मीनाक्षी दाक्षिणी, ५. मंजूषा होंडारणे. ५६ वर्षांवरी महिला (२ कि.मी.) : १. पुष्पा नवगिरे, २. विजया बैरागी, ३. सीमा दहाड, ४. निशी अग्रवाल, ५. रेणुका सर्वेये.तत्पूर्वी, आज सकाळी ७ वाजता विशेष पोलीस निरीक्षक मिलिंद भारंबे यांनी हिरवी झेंडी दाखवून हेरिटेज रनची सुरुवात केली. बक्षीस वितरण हॉकी खेळाचे आॅलिम्पियन अजित लाकरा, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, सहायक पोलीस उपायुक्त सी.डी. शेवगन, अजय कुलकर्णी, राधेश्याम त्रंबके, माया वैद्य, रणजित कक्कड, आशिष गाडेकर, डॉ. कर्नल प्रदीप कुमार यांच्या उपस्थितीतझाले.
ज्योती, नितीनने जिंकली हेरिटेज रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:03 AM