- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : ‘हायो तूडा हाकर बाला...बादाम बादाम दादा काचा बादाम...’ हे गाणे काय आहे, अनेकांना कळले नसेल; पण या बंगाली गाण्याने रातोरात सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (Kacha Badam Dada Kacha Badam viral song)
या गाण्याला भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या लोकांनीही अक्षरश: डोक्यावर घेतले. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचे व्हर्जन व्हायरल झाले आहेत. देशातच नव्हे, तर साऊथ आफ्रिका, टांझानियासह अनेक देशांत या गाण्यावर ठेका धरत असंख्य डान्स रील्स बनविले गेले आहेत. लाखोंच्या संख्येने त्या गाण्याला व्ह्यूज मिळत आहेत. मराठीत ज्यास भुईमूग शेंगा म्हटले जाते, त्यास ‘बंगाली भाषेत ‘चिना बादाम’ म्हणून ओळखतात. हे गाणे ऐकून अनेकांना भुईमूग शेंगा खाण्याची इच्छा झाली असेल, पण थोडी कळ सोसावी लागणार आहे. कारण, शहरात मे महिन्यापासून नवीन भुईमूग शेंगांची आवक सुरू होईल.
प. बंगालमधील भुईमूग शेंगा विक्रेता भुवन बादायकर हा भुईमूग शेंगा विकताना खास शैलीत गाणे म्हणतो. त्याची ही ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’च म्हणावी लागेल. त्याचे हे गाणे व्हायरल होताच सर्वांचे लक्ष ‘काचा बादाम’ कडे आकर्षित झाले आहे. सर्वांना भुईमूग शेंगा खाण्याची इच्छा होऊ लागली. शहरात अनेक जण भुईमूग शेंगांच्या शोधात भटकंती करताना दिसून आले. जाधववाडीतील अडत बाजारातही सध्या भुईमूग शेंगा दिसून येत नसल्याने खवय्यांचा हिरमोड होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त थोड्या प्रमाणात निजामाबादहून भुईमूग येण्याची शक्यता अडत व्यापारी इलियास बागवान यांनी व्यक्त केली.
नगर, मध्य प्रदेश, गुजरातहून होते आवकभुईमूग शेंगांचा नवीन हंगाम मे महिन्यापासून सुरू होतो. सप्टेंबरपर्यंत आवक असते. दिवाळीनंतर मध्य प्रदेश, गुजरातमधून आवक होते. हंगामात जाधववाडीत रोज ४० ते ५० टन भुईमूग शेंगांची आवक होते. आषाढी एकादशी, नवरात्रोत्सवात शेंगा जास्त विकल्या जातात.भय्या जागीरदार, अडत व्यापारी
भुईमूग शेंगांविषयी :१) औरंगाबादेत सर्वांत जास्त भुईमूग शेंगा नगर जिल्ह्यातून येतात.२) पावसाळ्यात भुईमूग शेंगा भाजून त्यासोबत गूळ खाण्याची मजा काही औरच असते.३) भुईमुगाच्या शेंगांत प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.४) १०० ग्रॅम भुईमुगामध्ये २६ ग्रॅम प्रोटीन मिळते.
वेगवेगळ्या भाषेत भुईमुगाला काय म्हणतात ?मराठी-- भुईमूग शेंगहिंदी---मूँगफल्लीबंगाली--- चिना बादामकानडी---कडलेकाईइंग्रजी --- ग्राउंडनटगुजराती- मगफलीतमिळ---निलकटला