कचनेर (जि. औरंगाबाद) : जैन धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कचनेर येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्रावर मंगळवारी देश- विदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक सोहळा ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. निमित्त होते वार्षिक यात्रा महामहोत्सवाचे.
चार दिवसीय या यात्रोत्सवातील मुख्य महामस्तकाभिषेक सोहळा मंगळवारी असल्याने लाखो भाविक कचनेरमध्ये दाखल झाले होते. आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव, आचार्य सौभाग्यसागरजी गुरुदेव, आचार्य मयंकसागरजी गुरुदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी बोलीयाच्या कार्यक्रमानंतर महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला आणि भाविकांच्या नजरा पांडुकशिलेवर विराजमान चिंतामणी बाबांच्या मूर्तीकडे खिळून होत्या.
महाशांतीधारा करण्याचा मान शांतादेवी, रमणलाल बाकलीवाल, कुणाल, दिलीप, हेमंत, विपीन, करण, मनोज बाकलीवाल परिवाराला मिळाला, तर इंद्र -इंद्राणीचा मान पूनमचंद कन्हैयालाल साहुजी, जयश्री पूनमचंद अग्रवाल साहुजी, विजयकुमार कन्हैयालाल जैन, प्रमोदिनी विजयकुमार जैन, डॉ. मदनलाल कन्हैयालाल अग्रवाल, विशाला मदनलाल अग्रवाल, देवराज, श्रृती, सन्मती, मयूर जैन, पंकज, वीरेंद्र अग्रवाल साहुजी परिवार यांना मिळाला. दुग्धाभिषेक- अमित, सुनील निकुंंज (बाराबंकी), सर्व औषधी- संतोष, सुरेखा काला (रायपूर), आम्ररस -अशोक जवाहर शाह (मुंबई), अर्चनाफळ - सुनीता प्रमोदकुमार, वृषभ कासलीवाल परिवाराला मिळाला. आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव व आचार्य सौभाग्यसागरजी गुरुदेव, आचार्य मयंकसागरजी गुरुदेव यांचे पादपक्षालन करण्यात आले. संपूर्ण महामस्तकाभिषेक सोहळा औरंगाबाद येथील णमोकार भक्ती मंडळाच्या साग्रसंगीतात संपन्न झाला.
बोलियाचे वाचन क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, सूत्रसंचालन कार्यकारिणी मंडळाचे प्रवीण लोहाडे यांनी केले. महाप्रसाददात्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले. यात्रा महोत्सवासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेसाठी औरंगाबादहून जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी राजाबाजार व हडको महिला मंडळ, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामस्थ परिश्रम घेत होते. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी. यू. जैन, व्यवस्थापकीय संचालक सुरेश कासलीवाल, संजय कासलीवाल, महेंद्र काले, सुभाष बोहरा, ललित पाटणी, भरत ठोळे, एम. आर. बडजाते, रवींद्र खडकपूरकर, प्रमोद जैन, फुलचंद जैन, कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष वृषभ गंगवाल, महामंत्री विनोद लोहाडे, प्रकाश गंगवाल, प्रमोद कासलीवाल, प्राचार्य किरण मास्ट आदींनी परिश्रम घेतले.
अमेरिकेहून आले यात्रेलामयूर जैन हे भाविक अमेरिकेहून खास यात्रेसाठी आले होते. त्यांची महामस्तकाभिषेकासाठी विशेष उपस्थिती होती. क्षेत्रातर्फे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रवचन...यावेळी प्रज्ञायोगी जैनाचार्य गुप्तीनंदीजी, आचार्य सौभाग्यसागरजी, आचार्य मयंसागरजी गुरुदेव यांचे प्रवचन झाले. त्यांनी आपल्या उपदेशात कचनेर क्षेत्राची महती सांगून आई-वडील, गुरुंचा आदर करण्याचा सल्ला दिला.