औरंगाबाद : पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग वनडे क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाने प्रेसिडेंट इलेव्हन संघावर ८ गडी राखून मात केली. प्रेसिडेंट इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना २४.५ षटकांत सर्वबाद ११४ धावा केल्या. प्रेसिडेंट इलेव्हनकडून ८ व्या स्थानावर फलंदाजी करणाºया हिंगोलीच्या सन्नी पंडित याने सर्वाधिक ४६ चेंडूंत ३९ धावा केल्या. कृष्णा पवारने १९ व अभिषेक धनावडेने २० धावा केल्या. केडन्स संघाकडून नितीश सालेकर याने ३३ धावांत आणि शुभम हरपाळे याने ३८ धावांत प्रत्येकी ४ गडी बाद केले. अक्षय वाईकरने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात केडन्स संघाने विजयी लक्ष्य १८.२ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून जय पांडेने ६० चेंडूंत ५५ धावा केल्या. पारस रत्नपारखीने नाबाद ३३ धावा केल्या. प्रेसिडेंट इलेव्हनकडून सन्नी पंडित आणि अभिषेक धनावडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया लढतीत क्बल आॅफ महाराष्ट्रने अहमदनगर संघावर ६ गडी राखून मात केली. अहमदनगरचा संघ २८.२ षटकांत १११ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून श्रीपाद निंबाळकरने ४० धावा केल्या. क्लब आॅफ महाराष्ट्रकडून अतीफ सय्यदने ३६ धावांत ५ गडी बाद केले. प्रज्वल गुंडने ३ व नौशाद शेखने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात क्लब आॅफ महाराष्ट्रने विजयी लक्ष्य २० षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सुजित उबाळेने ४४ व युवराज झाडगेने २८ धावा केल्या.नाशिक येथील लढतीत जळगावने डेक्कनचा १५८ धावांनी पराभव केला. जळगावने प्रथम फलंदाजी करीत ४९.३ षटकांत २३७ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषभ कर्वा याने ८४ चेंडूंत ९२ व सिद्धेश देशमुखने ५७ धावा केल्या. डेक्कनकडून स्वप्नील गुगळेने ३१ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डेक्कनचा संघ २०.३ षटकांत ७९ धावांत ढपाळला. त्यांच्याकडून अमेय श्रीखंडेने सर्वाधिक ३२ व मुकेश चौधरीने २२ धावा केल्या. जळगाव संघाकडून गौरव चौधरीने ३५ धावांत ५ गडी बाद केले. धवल हेमानी याने ३ व जगदीश झोपेने २ गडी बाद केले.
केडन्सची प्रेसिडेंट संघावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 1:19 AM