शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

प्रभारी महापौरपदी कैलास कांबळे

By admin | Published: May 03, 2016 12:00 AM

लातूर : महापौर अख्तर शेख यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे महापौर व नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे़ परिणामी,

नव्या महापौरांची निवड होईपर्यंत राहणार पदभारलातूर : महापौर अख्तर शेख यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे महापौर व नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे़ परिणामी, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महापौरपदी काँग्रेस पक्षाने प्रभारी महापौर म्हणून उपमहापौर कैलास कांबळे यांची निवड केली आहे़ नव्या महापौरांची निवड होईपर्यंत महापौर पदाचा पदभार त्यांच्याकडे राहणार आहे़विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २१ एप्रिल रोजी महापौर अख्तर शेख यांचे ‘मिस्त्री’ या जातीचा जाती दावा अमान्य करून जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले होते़ जात पडताळणी समितीच्या या निर्णया विरुद्ध अख्तर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती़ मात्र न्यायालयाने २८ एप्रिल रोजी विभागीय जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला आहे़ त्यामुळे अख्तर शेख यांचे नगरसेवक व महापौरपद रद्द झाल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमुद आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार अख्तर शेख यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांच्याकडे सादर केला होता़ महापौर शेख यांचा राजीनामा पक्षाकडे येताच तो मंजूर करून मनपा आयुक्तांकडे कारवाईसाठी सादर केला आहे़ आयुक्तांनी सदर राजीनामा विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ दरम्यान, महापौरपदाचा अतिरीक्त कारभार उपमहापौर कैलास कांबळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला असून, नव्याने महापौरांची निवड होईपर्यंत हा पदभार उपमहापौर कैलास कांबळे यांच्याकडे राहणार आहे़ दरम्यान, प्रभारी महापौरपदी निवड होताच कैलास कांबळे यांनी माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री आ़दिलीपराव देशमुख यांची सोमवारी भेट घेतली़ यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, नगरसेवक राजकुमार जाधव, पृथ्वीराज सिरसाठ, सुपर्ण जगताप, दिलीप माने, युनुस मोमिन, अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती़महापौर निवडीकडे लक्ष़़़प्रभारी महापौरपदाचा पदभार उपमहापौर कैलास कांबळे यांच्याकडे सोपविला असला तरी महापौरपदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे़ १० महिन्याचा कार्यकाळ मिळणार असल्याने अनेकजण या पदावर आपली वर्णी लागण्यासाठी श्रेष्ठींकडे प्रयत्न करीत आहेत़ सध्या मनपाच्या राजकीय वर्तुळात महापौर पदासाठी चार - पाच जणांच्या नावाची चर्चा असून, त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडेल याची उत्सुकता आहे़ विद्यमान परिवहन सभापती विक्रांत गोजमगुंडे, स्थायीचे माजी सभापती राम कोंबडे, अ‍ॅड़दीपक सुळ, असगर पटेल, महादेव बरुरे ही नावे चर्चेत आहेत़