शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:22 IST

साईनगर, शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती.

औरंगाबाद : साईनगर, शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. मात्र, लुटमार करणारे फरार झाले अन् जनरलचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे उघडकीस येत आहे. त्यांचे शुक्रवारी सकाळी मनमाड जनरल रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.

साईनगर, शिर्डीहून काकीनाडाकडे जाणाऱ्या काकीनाडा एक्स्प्रेसच्या एस १ आणि एस ८ या दोन डब्यांमध्ये नगरसोल ते अंकाई किल्ल्यादरम्यान दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. यात चार महिलांचे दागिने लंपास करण्यात आले. दरोडेखोरांनी खिडक्यांतूनच ही लुटमार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तर दुसरीकडे हा गोंधळ सुरू असतानाच काही प्रवाशांनीच चेन ओढून रेल्वे थांबवली. वैजापूर आणि येवल्याचे काही प्रवासी जनरल तिकीट काढून याच डब्यात घुसले होते. त्यांनाच दरोडेखोर समजून डब्यातील प्रवाशांनी चोप देण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद स्थानकावर आल्यानंतर आठ जणांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, प्रवाशांनी स्थानकावरच गोंधळ घालत रेल्वे पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला. प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवताना दरोडेखोर किती होते हे नेमके समजू शकले नाही. मात्र, संशयित म्हणून भलत्याच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आले. नगरसोल रेल्वे पोलीस बलाचे सहायक निरीक्षक विजय वाघ यांनी शुक्रवारी आठही संशयितांना मनमाड जनरल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

संशयित म्हणून अन्य प्रवासी ताब्यात नगरसोल ते अंकाई किल्ल्यादरम्यान गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास काही प्रवाशांना लुटण्यात आले. मात्र, लुटमार करणारे फरार झाले, तर जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणाऱ्यांनाच संशयित म्हणून अन्य प्रवाशांनी ताब्यात दिल्याचे आढळून आले आहे. - दिलीप कांबळे, सहायक निरीक्षक, रेल्वे पोलीस बल, औरंगाबाद

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनpassengerप्रवासी