शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

कळमनुरीतील दरोडा; अखेर दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:01 AM

जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी या प्रकारचे गुन्हे घडले होते. सदर गंभीर गुन्हे उघडकीस येत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान होते. यासाठी विशेष पथक स्थापन करून या घटनेतील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ४ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी या प्रकारचे गुन्हे घडले होते. सदर गंभीर गुन्हे उघडकीस येत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान होते. यासाठी विशेष पथक स्थापन करून या घटनेतील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ४ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, स्थागुशाचे पोनि मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले. पथकामध्ये पोउपनि व्ही.ए. लंबे, पोहेकॉ नानाराव पोले, हिदायत अली, विलास सोनवणे, संतोष वाठोरे, गणेश राठोड, फुलाजी सावळे, उंबरकर, शेख एजाज, पंचलिंगे आदींची नियुक्ती करून जिल्ह्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आणणे याबाबत मार्गदर्शन केले.त्यानुसार पोलीस स्टेशन कळमनुरी येथे घडलेल्या घरावरील दरोडा व सोनेचांदीच्या दुकानातील चोरीच्या गुन्ह्याची पद्धत व आरोपींचे घटनास्थळीच्या माहितीवरून अशा प्रकारच्या गुन्हा करणाºयांचे रेकॉर्ड पथकाने काढले. पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उमरी तालुका जि. नांदेड येथील प्रेमसिंग उर्फ पिल्लू धरमसिंग खिच्ची (२२), राजूसिंग मायासिंग बावरी (२७) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता वरील दोन्ही गुन्हे इतर साथीदारांसह केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याचांदीचे दागिने अंदाजे किमत ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी सध्या कळमनुरी पोलीस ठाण्यात कोठडीत आहेत. तसेच १२ जुलै रोजी एकाच दिवशी हिंगोली शहर, औंढा नागनाथ, वसमत शहर या ठिकाणी दुचाकीवरून रस्त्यावरून जाणाºया इसम व महिलांचे पर्स, मोबाईल हिसकावून नेणाºया तिघांवर जबरीचोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादीकडून आरोपींची वेशभूषा व वर्णन घेतले व शोधमोहीम सुरू केली. नांदेड येथील अजय उर्फ गोप्या ढगे हा आपल्या वेगवेगळ्या साथीदारांसह अशा प्रकारचे गुन्हे करतो, अशी माहिती पोलिसांनी मिळाली.या प्रकरणातील गुन्हेगारांची अधिक चौकशी केली जात असून त्यांच्याविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले.