लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कांचनवाडीतील मनपा मालकीच्या ४० एकर जागेवर कचरा टाकण्यास पालिकेने पाठविलेली वाहने नागरिकांनी शनिवारी रोखून दगडफेक केली. तीन दिवसांपासून पश्चिम मतदारसंघातील विविध ठिकाणी कचरा टाकण्याचा पालिकेने प्रयत्न केला; परंतु नागरिकांनी तो हाणून पाडला. कचºयावरून राजकारण पेटले असून, शिवसेनाविरुद्ध भाजप असा संघर्ष यापुढे विकोपाला जाण्याची शक्यता आहे.पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले, कांचनवाडीतील ४० एकर जागा मनपाच्या मालकीची आहे, तेथे कचरा टाकण्याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेचे जवळपास एकमत झाल्याने शनिवारी तेथे कचरा घेऊन वाहने गेली.त्या वाहनांवर नागरिकांनी जोरदार दगडफेक करीत कचरा टाकण्यास विरोध केला. दुपारच्या सुमारास कांचनवाडीत मोठा जमाव मनपा वाहनांच्या समोर आला. यामध्ये महिला व बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.त्या जागेवर दोन पोकलेनच्या मदतीने खोदकाम सुरू केले होते; परंतु नागरिकांनी विरोध केला. गुरुवारी कचरा टाकण्यास विरोध करणाºयांविरोधात पोलिसांत तक्रार दिली.शुक्रवारी धुळवड असल्यामुळे कचरा उचलला गेला नाही. तो कचरा शनिवारी उचलल्यानंतर कांचनवाडी, गोलवाडी परिसरात नेण्यास सुरुवात झाली. कांचनवाडीतील वाहनांवर नागरिकांनी दगडफेक करून ती ३ वाजेपर्यंत रोखली. काही नागरिक वाहनांपुढे आडवे पडले. यामध्ये महिला व बालकांचा मोठा समावेश होता.विरोधामुळे कचºयाने भरलेली वाहने मनपाने मागे घेतली. दरम्यान, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बळाचा वापर करू नये, असे आदेश दिल्यामुळे जमावाला शांततेत पांगविण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी मुख्य सचिव किंवा विभागीय आयुक्त कोर्टामध्ये नारेगाव कचरा डेपोप्रकरणी शपथपत्र दाखल करतील. त्याआधारेच काय निर्णय व्हायचा तो होईल.महापौरांची तारेवरची कसरतकचराडेपोच्या विरोधातील आंदोलनात महापौर नंदकुमार घोडेले हे एकटेच सर्व यंत्रणेशी दोन हात करीत आहेत. प्रशासन म्हणून १५ दिवस काहीही ठोस पाऊल न उचलल्यामुळे कचºयामध्ये मतदारसंघनिहाय राजकारण शिरले आहे.शिवसेनाविरुद्ध भाजप असा संघर्ष यापुढे होण्याची शक्यता आहे. इतर खाबूगिरीच्या धोरणात सगळी पालिका मिळून-मिसळून सोबत असते; परंतु कचºयासारख्या संवेदनशील प्रश्नावर महापौरांना सर्वांनी मिळून कोंडीत पकडल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.गांधेलीत जागेची पाहणीआयुक्त मुगळीकर यांनी शनिवारी सायंकाळी गांधेलीतील खदानींची पाहणी केली. त्यामुळे तेथील गावकºयांनी रात्रीच तातडीची बैठक घेऊन विरोधाचे हत्यार उपसले आहे. तीसगाव, छावणी परिसर, हनुमान टेकडी, गोलवाडी, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, जांभाळा, हर्सूल परिसरासह वॉर्डातील खुल्या जागेत कचरा टाकण्यासाठी विरोध होतो आहे.
कचरा डेपोविरोधात कांचनवाडीत उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:10 AM
कांचनवाडीतील मनपा मालकीच्या ४० एकर जागेवर कचरा टाकण्यास पालिकेने पाठविलेली वाहने नागरिकांनी शनिवारी रोखून दगडफेक केली. तीन दिवसांपासून पश्चिम मतदारसंघातील विविध ठिकाणी कचरा टाकण्याचा पालिकेने प्रयत्न केला; परंतु नागरिकांनी तो हाणून पाडला. कचºयावरून राजकारण पेटले असून, शिवसेनाविरुद्ध भाजप असा संघर्ष यापुढे विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देसलग दुस-या दिवशीही कच-याच्या गाड्या फोडल्या : कच-यामुळे बिल्डर लॉबीही धास्तावली; कच-यावरून राजकारण; शिवसेनाविरुद्ध भाजप संघर्ष