लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराविरोधात बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी लक्षवेधी मते घेतली. मात्र यामुळेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याचे शैल्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तेव्हापासून जाधव आणि खैरे यांचा संघर्ष अधिक तीव्र होत गेला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांना या भागात मिळालेल्या मतांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने त्यांना निवडणूक सोपी नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांना भाजपचे किशोर पवार यांचा बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पवार यांच्या बंडखोरीने निवडणुकीचे समीकरण बदलली आहेत. नवीन चेहरा व आघाडीची उमेदवारी आणि पंधरा वर्षांपासून नगर परिषदेत सत्ता असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे यांना मिळेल असे चित्र आहे.
कन्नड -७ व्या फेरीअखेर- उदयसिंग राजपूत ( सेना ) २५१८७- हर्षवर्धन जाधव ( अपक्ष ) १४१३८- संतोष कोल्हे ( राष्ट्रवादी ) १२४३८शिवसेनेचे उदयसिंग राजपूत ११०४९ मतांनी आघाडीवर
असे होते २०१४ चे चित्र :हर्षवर्धन जाधव (सेना-विजयी) उदयसिंग राजपूत (राष्ट्रवादी काँग्रेस- पराभूत)