औरंगाबाद : एमजीएमच्या क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत कन्नड सुपर किंगने यंग इलेव्हन अ संघावर २३ धावांनी, तर अलॉफ्ट लायमरने महावितरण संघावर सुपर ओव्हरमध्ये ५ धावांनी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली.कन्नडने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ६ बाद १६२ धावा केल्या. त्यांच्याकडून शशी कदमने ४ षटकार व २ चौकारांसह ४३ धावा केल्या. सलमान अहमदने ३३, स्वप्नील साळवीने २४ व आशिष मोरेने २१ धावा केल्या. यंग इलेव्हनकडून निरंजन चव्हाण याने ४ गडी बाद केले. संदीप सहानीने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन ६ बाद १३९ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून राहुल शर्माने एकाकी झुंज देत ५१ धावा केल्या. अजय काळेने २0 व मनीष रावने २ गडी बाद केले.दुपारच्या सत्रात महावितरणने ९ बाद १0५ धावा केल्या. त्यांच्याकडून हरमितसिंग रागीने ३८, सचिन पाटीलने २0 धावा केल्या. अलॉफ्टतर्फे फहाद अलीने ४, तर मोहंमद इम्रान व सय्यद जावेदने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात अलॉफ्ट लायमरही १९.४ षटकांत १0५ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून मधुर पटेलने २६ व अब्दुल कय्युमने १९ धावा केल्या. महावितरणकडून हरमितसिंग रागी, भास्कर जिवरग, शाहिद सिद्दीकी व अनिरुद्ध शास्त्री यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये लायमरने एका षटकात ९ धावा केल्या. प्रत्युत्तरात महावितरण संघ १ बाद ४ धावाच करू शकला. कन्नड व अलॉफ्ट लायमर यांच्यातील लढत बुधवारी सकाळी १0 वाजता एमजीएमच्या क्रिकेट मैदानावर रंगणार असल्याचे संयोजक सागर शेवाळे यांनी कळवले आहे.
कन्नड, लायमर संघात विजेतेपदाची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:52 PM
एमजीएमच्या क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत कन्नड सुपर किंगने यंग इलेव्हन अ संघावर २३ धावांनी, तर अलॉफ्ट लायमरने महावितरण संघावर सुपर ओव्हरमध्ये ५ धावांनी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली.
ठळक मुद्देएमजीएम ट्वेंटी २0 क्रिकेट : हरमितसिंग, शशी, सामनावीर, निरंजन, राहुलही चमकले