तालुक्यात विवाह समारंभ, धार्मिक कार्यक्रम, उद्घाटने, भूमिपूजन आदी राजकीय कार्यक्रमांना गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कन्नड तालुका कोरोना हॉटस्पॉट व्हायला वेळ लागणार नाही. उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांनी वारंवार आवाहन करूनही नागरिक बेपर्वाईने वागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता कडक कारवाई करावी, अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये कन्नड शहरातील दत्त कॉलनी, विवेकानंद कॉलनी, समर्थनगर, माळीवाडा, गणेश कॉलनी, हिवरखेडा रोड, शिवशंकर कॉलनी येथे प्रत्येकी एक, सुवर्णपालेश्वर कॉलनी (७), प्रगती कॉलनी (५), संभाजी कॉलनी (२), श्रीराम कॉलनी (४), तर ग्रामीण भागातील देवगाव, गराडा, मुंडवाडी, नागापूर, नरसिंगपूर, टाकळी, चिंचखेडा खु., नेवपूर, वासडी, शिवराई, गणेशनगर व वाकद येथे प्रत्येकी एक, नागद, नाचनवेल व बनशेंद्रा येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. सध्या विविध दवाखान्यांमध्ये १६७ जणांवर उपचार सुरु असून, गुरुवारी २० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
कन्नड तालुका बनतोय हॉटस्पॉट, एकाच दिवसात ४४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:05 AM