शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

By विकास राऊत | Updated: May 18, 2024 13:16 IST

सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले. मतदान केंद्रांवरील आकडे शिवसेना, एमआयएम आणि ठाकरेसेनेत ‘काँटे की टक्कर’ होईल, असे सांगत आहेत. सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झाल्याचे प्राथमिकरीत्या दिसते. शहरी भागातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर ८० ते ९० टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान एमआयएमच्या आशा पल्लवीत करीत आहेत. तर त्या तुलनेत हिंदूबहुल भागातील केंद्रांवरही ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केंद्रांचा आकडा मोठा असल्यामुळे महायुतीने विजयाचे गणित मांडत आहे. हिंदू वसाहतींमध्ये वाढलेल्या मतदानामुळे ठाकरे गटाला मोठी अपेक्षा आहे. तर वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या पारड्यात किती मते गेली, याची आकडेमोड राजकीय पक्ष करीत आहेत.

शहर व ग्रामीण मतदानाची तुलना

शहरात झालेले मतदान : ६ लाख ५३ हजार ९१७ग्रामीणमध्ये झालेले मतदान : ६ लाख ४५ हजार १२३शहरात ग्रामीणपेक्षा ८ हजार ७९४ मतदान जास्तएकूण मतदान : १२ लाख ९९ हजार ४०

७० टक्क्यांहून अधिक मतदान किती केंद्रांवर?कन्नड : ३५९..............७०औरंगाबाद मध्य : ३१६.....६०औरंगाबाद पश्चिम : ३७४.......६०औरंगाबाद पूर्व : ३०५......७०गंगापूर : ३४८..........६०वैजापूर : ३३८........५५एकूण : ३७५

मुस्लिम पट्ट्यांतील बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदानशहरातील तिन्ही मतदारसंघांत मुस्लिम मतदान असलेल्या मतदान केंद्रांची संख्या ३०० च्या आसपास आहे. त्यावर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केेंद्रांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर उर्वरित बूथवर ६० ते ७० टक्के मतदान झाले आहे.

हिंदूबहुल भागातही दणकावून मतदानशहरातील ९९५ पैकी सुमारे ६९५ मतदान केंद्र हिंदू आणि दलित व इतर मतदारांचे प्राबल्य असलेले आहेत. त्यातील हिंदूबहुल प्राबल्य असलेल्या ८० टक्के बूथवर दणकावून मतदान झाले आहे. या वाढलेल्या मतदानावर महायुती आणि महाविकास आघाडीसह एमआयएमदेखील दावा करीत आहे.

ग्रामीण भागात किती बूथ ८० टक्क्यांच्या पुढे?ग्रामीण भागात १०२५ मतदान केंद्र आहेत. त्यातील ४०० बूथवर ८० टक्क्यांपेक्षा जास्तीचे मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यात गंगापूर, वैजापूर, कन्नडमधील मतदान केंद्रांचा समावेश आहे. यात गंगापूर ६०, वैजापूर ५० तर कन्नडमध्ये ६० बूथवर मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.

कुणाचे गणित काय?ग्रामीण भागात झालेल्या मतदानाच्या तुलनेत शहरातील तिन्ही मतदारसंघात ८ हजार ७९४ मतदान जास्त झाले. एमआयएमची भिस्त शहरातील मतदान केंद्रांवर अधिक आहे. ग्रामीण भागात मुस्लिम मतदान आणि काही प्रमाणात दलित व हिंदू मतदानांमुळे विजय होण्याची अपेक्षा एमआयएमला आहे. महायुती २०४० मतदान केंद्रांपैकी सुमारे १७०० मतदान केंद्रांवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत आहे. तर ठाकरे गट २०४० बूथवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत विजयाचे गणित मांडत आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४