शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

कोरोनाग्रस्त माता अन् बाळ व्हिडिओ कॉलवरच होते संपर्कात, अनोख्या घटनेला ३ वर्ष पूर्ण

By संतोष हिरेमठ | Published: April 19, 2023 11:39 AM

कोरोना काळात जन्मलेली करिना आठवते का? मातृत्वापुढे हरलेल्या कोरोनाच्या या घटनेला तीन वर्ष पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात चर्चा झालेली कोरोना काळात जन्मलेली ‘करिना’ आठवते का? छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ वर्षांपूर्वी कोरोनाबाधित महिलेची जिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली होती. जन्मानंतर तब्बल २५ दिवस ही चिमुकली आईपासून दूर होती. त्या काळात ती माता फक्त व्हिडिओ काॅलिंगवरूनच नवजात मुलीला पाहत होती. हीच ती करिना. मातृत्वापुढे हरलेल्या कोरोनाच्या या घटनेला मंगळवारी ३ वर्षे पूर्ण झाले.

जाेगेश्वरी पश्चिम (मुंबई) येथून शहरात आलेल्या कोरोनाबाधित महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात १८ एप्रिल २०२० रोजी सिझेरियन प्रसूती झाली. या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. कोरोना प्रादुर्भावात अशा प्रकारची देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिलीच प्रसूती ठरली. नवजात मुलीला कोरोना होऊ नये, म्हणून तिला आईपासून दूर ठेवण्यात आले होते. प्रसूतीनंतर तब्बल २५ दिवस ही माता मुलीपासून दूर होती. तेव्हा ‘लोकमत’ प्रतिनिधीने सुचविलेल्या कल्पनेनंतर कोरोनाबाधित आई आणि मुलीची व्हिडिओ काॅलिंगद्वारे भेट घडविण्यात आली होती. तेव्हा ही बाब देशभरातील माध्यमांवरील चर्चेचा विषय ठरली होती. रुग्णालयातून सुटी होताना जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिकांनी या कोरोना गर्लचे नाव ‘करिना’ असे ठेवले. करिना मंगळवारी तीन वर्षांची होतेय. तिच्या जन्माचा तो काळ आणि आताची परिस्थिती यात खूप अंतर आहे, असे तिच्या आईने ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

व्हिडिओ काॅलनंतर आता रिल्सजन्मानंतर काही तासांतच करिनाचा व्हिडिओ काॅलिंगद्वारे मोबाईलशी संबंध जोडला गेला. आता तीन वर्षांची असताना आईच्या मदतीने ती चित्रपटांच्या गीतांवर स्वत:चे रिल्सही तयार करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद