बीड : शहरातील शाहूनगर भागातील एका लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अधीक्षकांच्या पथकाने पर्दाफाश केला होता. पथकाच्या छाप्यानंतर लॉजमालकास पकडण्यात शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी विलंब केला. त्यामुळे अधीक्षक अनिल पारसकर यांनी त्यांच्याकडे रविवारी खुलासा मागविला आहे.१० मार्च रोजी रात्री एक तरुणी, दोन आंटींसह एक तरूण ओंकार लॉजमधील एका खोलीत आढळले होते. अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी तेथे छापा टाकला. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकासही अटक केली हाती. मात्र, छाप्यावेळी लॉजमालक महादेव सानप तेथे नव्हता. त्याला रात्रीतून ताब्यात घेणे आवश्यक होते;परंतु निरीक्षक कस्तुरे यांनी दिरंगाई केली, त्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला, असा ठपका कस्तुरेंवर आहे. अधीक्षक पारसकर यांनी सर्व ठाणेप्रमुखांना यापूर्वीच आपल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर करडी जनर ठेवण्याचे फर्मान सोडले होते. मात्र, शिवाजीनगर ठाणे हद्दीत वेश्याव्यवसाय चालत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पारसकर यांनी ‘आपल्या ठाणे हद्दीत हा व्यवसाय कसा काय चालत होता?’ असा प्रश्न करुन तत्काळ खुलासा सादर करा, असे आदेश दिले आहेत.यावरून कस्तुरे हे किती ‘कर्तव्यदक्ष’ आहेत ? हे ही उघड झाले आहे. अधीक्षकांनी खुलासा मागविल्यामुळे कस्तुरे पुरते बैचेन आहेत. (प्रतिनिधी)ओंकार लॉजमध्ये पकडलेल्या तरुणासह लॉजव्यवस्थापकाचे नाव माध्यमांपर्यंत न पोहोचू देण्याची पुरेपूर काळजी निरीक्षक कस्तुरे यांनी घेतली.४तपासाबाबत विचारले असता, आरोपी पोलीस कोठडीत आहेत, चौकशी करु असे उत्तर त्यांनी दिले. ४पीडित तरुणी आंटीच्या संपर्कात कशी आली? किती दिवसांपासून हा उद्योग सुरु होता? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी सोयीस्करपणे टाळली.
कस्तुरेंना मागितला अधीक्षकांनी खुलासा
By admin | Published: March 15, 2016 12:10 AM