फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापूर येथे ऊर्मी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कविता महोत्सवाचा रविवारी समारोप झाला.या महोत्सवाचे उद्घाटन रंगनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. महोत्सवाच्या अध्यक्षा डॉ. कविता मुरूमकर, प्रा. जयराम खेडेकर, प्रमुख पाहुण्या प्राचार्या डॉ. संध्या दुधगावकर आदींनी मार्गदर्शन केले. दोन दिवस विविध कार्यक्रमांसह राज्यातून आलेल्या अनेक कवींनी काव्य सादरीकरण करुन लक्ष वेधले. नागपूरचे डॉ. पवन कोरडे यांनी आपल्या कवितांमधून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रा. जयराम खेडेकर, वर्षा बोध, प्रा. डॉ. शशिकांत पाटील, प्रा. विजया मारोतकर, विवेक जोशी, प्रदीप देशमुख, रज्जाक शेख, सत्यभूषण अवस्थी, लिना निकम, अंजुमन शेख, निता खोत, विजय शिंदे आदींनी आपल्या कवितांचे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले. निसर्गरम्य वातावरणात रंगलेल्या महोत्सवात कवी आनंदी होऊन परतले.