औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध विजय मिळवण्यासाठी केरळ संघाला ३९५ धावांची गरज असून, त्यांचे ९ फलंदाज बाकी आहेत. दिवसअखेर त्यांनी १४ षटकांत १ गडी गमावून १९ धावा केल्या आहेत. अमला सीए ११ व वत्सल हा १ धावेवर खेळत आहे. निखिल जोस ६ धावांवर धावबाद झाला.त्याआधी अथर्व काळेच्या १0४ धावांच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ३३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात केरळने पहिल्या डावात २0६ धावा फटकावल्या. पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी घेणाºया महाराष्ट्राने त्यांचा दुसरा डाव ३ बाद २८७ धावांवर घोषित करीत केरळसमोर विजयासाठी ४१४ धावांचे कठीण आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात शतक झळकावणाºया अथर्व काळे याने दुसºया डावातही १0३ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली, तसेच कर्णधार ओम भोसले याच्या साथीने तिसºया गड्यासाठी १९३ धावांची भागीदारी केली. ओम भोसले याने ११३ चेंडूंत १0 चौकारांसह ९४ धावा केल्या. सलामीवीर पवन शाह याने ८५ चेंडूंत ९ चौकारांसह ६४ धावांचे योगदान दिले. विजयासाठी ४१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरळने धावफलकावर १६ धावा असताना सलामीवीर निखिल जोस याला गमावले. निखिल जोस ६ धावांवर धावबाद झाला.संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र (पहिला डाव): ३३२. दुसरा डाव : ३ बाद २८७ (घोषित). (अथर्व काळे नाबाद ११२, ओम भोसले ९४, पवन शाह ६४. विनील टी. एस. १/५५).केरळ (पहिला डाव) : ९६.३ षटकांत सर्वबाद २0६. दुसरा डाव : १ बाद १९.
केरळला विजयासाठी ३९५ धावांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:48 AM