छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्याच्या आंदोलनाची प्रेरणा देणारी ‘खादी’, विदेशी कपड्यांवर बहिष्कार करण्याच्या महात्मा गांधींच्या घोषणेनंतर स्वदेशी आंदोलनाद्वारे घराघरात पोहोचलेली खादी आज फॅशन स्टेटस बनली आहे. देशातील फॅशन डिझाइनर्सने खादीत नवनवीन प्रयोग केले आणि या खादीला ‘फॅशनेबल लुक’ दिले आणि तरुणाई ‘खादी’ कपड्यांवर फिदा आहे.
दीड कोटीची खादी-विक्रीखादीचा ड्रेस परिधान करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आठवडाभर खादीच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होती. या काळात शहरात खादी-विक्रीत दीड कोटीच्या दरम्यान उलाढाल झाल्याचा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला.
अभिनेते नव्हे, नेते ‘आयडॉल’पूर्वी हिंदी चित्रपटातील अभिनेत्याने चित्रपटात परिधान केलेल्या ड्रेसची फॅशन येत असे. मात्र, आता बडे राजकीय नेते तरुणाईचे ‘आयडॉल’ बनले आहेत. बहुतांश राजकीय नेते खादीचे वेगवेगळ्या रंगातील जॅकेट, कुर्ता पायजमा परिधान करीत असतात. तीच क्रेझ तरुणाईत, विशेषत: कार्यकर्त्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे.
खादी कडक, रुबाब बेधडकपेपर कॉटन, मटका खादीला तरुणाईत मागणी आहे. प्युअर खादीही प्लेन असते. मात्र, कोलकत्ता खादी, फाईन खादी, अलिगढ खादी, लखनौ खादीत नवनवीन प्रयोग झाले आहेत. देशातील नामांकित डिझाईनरने खादीचे फॅशन शो करून खादीला आणखी नावारूपाला आणले आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही, कडक खादीचा कुर्ता, पायजमा पाहिजे असतो. कारण, खादी घातल्यावर त्यांचा रुबाब वाढतो.- मधुर अग्रवाल, खादीचे व्यापारी
जॅकेट सदाबहारशर्ट पॉलिस्टरचा असो वा कॉटनचा; खाली जिन्सीची पॅन्ट आणि शर्टवर खादीचे जॅकेट असा पेहराव तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. विविध रंगातील विविध डिझाईनमधील जॅकेट उपलब्ध आहेत.
पांढरी शुभ्र खादी एव्हरग्रीनविविध रंगांत खादीचा कपडा मिळत असला तरी पांढरी शुभ्र खादी सर्वाधिक विकली जाते. राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते अशी खादी परिधान करतातच, शिवाय एरव्ही सणासुदीच्या दिवसांत, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी किंवा महापुरुषांच्या जयंतीला तरुणाई आवर्जून पांढऱ्याशुभ्र खादीचे कपडे परिधान करते.
खादी किंमतरेडीमेड शर्ट-पॅन्ट १,२०० रुपयांपासून पुढेकुर्ता-पायजमा ७०० रुपयांपासून पुढे