शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

खोडवेकर यांची अखेर पुण्याला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:01 AM

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची अखेर पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची अखेर पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. आ.डॉ.राहुल पाटील, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी खोडवेकर यांच्या निर्णयासंदर्भात विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा आदींच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या. आ.दुर्राणी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरु आहे. तर आ.डॉ.राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खोडवेकर यांना त्यांची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल, असे आश्वासन दिले होते. शासनाचा आदेश येण्याअगोदर १५ दिवसांपूर्वी खोडवेकर स्वत:च रजेवर गेले. त्यानंतर त्यांचा पदभार प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषद प्रशासनास खोडवेकर यांच्या बदली संदर्भातील पत्र प्राप्त झाले. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या या पत्रात खोडवेकर यांची पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्प संचालकपदाच्या रिक्त जागेवर नियुक्ती केल्याचे नमूद करण्यात आले आहे. खोडवेकर यांनी त्यांचा कार्यभार औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाºयांकडे सोपवून नवीन पदभार त्वरित स्वीकारावा, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे खोडवेकर यांना एकतर्फीच कार्यमुक्त करण्यात आले आहे.दरम्यान, खोडवेकर यांच्या बदलीचे वृत्त गुरुवारी सायंकाळी येताच विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कर्मचारी संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकाºयांच्या खोडवेकर यांनी परभणीतून इतर तालुक्याच्या ठिकाणी बदल्या केल्या होत्या. शिवाय पदाधिकारी व अनेक कर्मचाºयांनीही त्यांच्या कामकाजासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.