औरंगाबाद : शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्ती व उत्पन्नाच्या स्रोतानुसार त्यांची कुटुंबासह असलेली संपत्ती ८ कोटी ९८ लाख ३० हजार ३२१ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्यावेळी ९ कोटींच्या आसपास खा. खैरे यांनी संपत्तीचा तपशील उमेदवारी अर्जात दिला होता.स्वत: खैरे यांच्याकडे ५० हजार रोख, पत्नी वैजयंती खैरेंकडे ४० हजार रुपये, तर मुलगा ऋषिकेश खैरेंकडे १० हजार, सून प्रज्ञा खैरे यांच्याकडे २० हजार रुपये रोख असल्याचे त्यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.लोकसभा सदस्यत्वाचे मानधन हा खैरेंच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून, मुलगा ऋषिकेश हा भीमाशंकर इंडस्ट्रिजमध्ये भागीदार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. समता सहकारी बँक, कोपरगावचे ३ कोटी १३ लाख ९० हजार ३०९ रुपयांचे कर्ज असल्याचे खैरे यांनी शपथपत्रात दाखविले आहे. ऋषिकेश इंडस्ट्रिज, शेअर्स, बंधपत्रे, कंपन्यांत खैरेंची गुंतवणूक आहे. युधिराज इंजि.प्रा.लि आणि जयभद्रा एंटरप्रायजेस, श्री भीमाशंकर इंडस्ट्रिजमध्ये ऋषिकेश यांनी २ लाख गुंतविले आहेत. दोन चारचाकी, दोन दुचाकी कुटुंबाकडे आहेत. वीज, मालमत्ताकर, दूरध्वनी व इतर कुठले देणे नसल्याचा दावा खैरे यांनी केला आहे.४३ तोळे सोने, दीड किलो चांदीजडजवाहर, सोने-चांदी व मौल्यवान वस्तूंचे वजन आणि किमतीचा तपशील देताना खैरे यांनी ११ लाख ८५ हजार रुपयांचे ४३ तोळे सोने व ५० हजार रुपयांची १ किलो ६०० ग्रॅम चांदी असल्याचे सांगितले आहे. पत्नी वैजयंती यांच्या नावे बिडकीन येथे १५ एकर जमीन व इतर मिळून ४ कोटी ६५ लाख रुपयांची मालमत्ता त्यांनी दाखविली आहे. स्वत:च्या नावावर २ कोटी ८४ लाख १० हजार ३०० रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. खैरेंकडे ६४ लाख १६ हजार ६३३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पत्नी वैजयंती यांच्याकडे ८१ लाख २४ हजार ६३३, तर मुलगा ऋषिकेशकडे ३ लाख ४८ हजार ६५५ आणि सून प्रज्ञाकडे २० हजाराची मालमत्ता आहे.
खैरे कुटुंब ८ कोटी ९८ लाख ३० हजार ३२१ रुपयांचे धनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:20 PM
औरंगाबाद : शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या संपत्ती व उत्पन्नाच्या स्रोतानुसार त्यांची कुटुंबासह ...
ठळक मुद्दे४३ तोळे सोने, दीड किलो चांदी : लोकसभा सदस्याचे वेतन हाच उत्पन्नाचा स्रोत