शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

खैरेंनी दुस-यांच्या नावे शेंगा खाऊ नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:30 AM

शहराचे ‘औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून शिवसेनेतच जुंपली आहे. खा.चंद्रकांत खैैरेंनी दुसºयांच्या नावे शेंगा खाण्यापेक्षा स्वत: काय करतात ते पाहावे. शिवसेनेचे सर्व मंत्री नालायक आणि ते एकटेच लायक आहेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेना मराठवाडा नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराचे ‘औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर’ असे नामकरण करण्यावरून शिवसेनेतच जुंपली आहे. खा.चंद्रकांत खैैरेंनी दुसºयांच्या नावे शेंगा खाण्यापेक्षा स्वत: काय करतात ते पाहावे. शिवसेनेचे सर्व मंत्री नालायक आणि ते एकटेच लायक आहेत, असा टोला पालकमंत्री तथा शिवसेना मराठवाडा नेते रामदास कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.दोन दिवसांपूर्वी खा.चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेतील सर्व मंत्र्यांवर शहराचे नाव संभाजीनगर करण्याप्रकरणी खापर फोडले होते.   पालकमंत्र्यांचा दौरा गुप्तपालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा गुप्त होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कदम शहरात येऊन गेले हे खैरेंच्या निकटवर्तीयांना माहितीही नव्हते. त्यामुळे पालकमंत्री कदम काय बोलले याची माहिती खैरे गटांकडून घेण्यात येत होती.नामांतरासाठी शिवसेनेची निदर्शनेऔरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने रविवारी सकाळी टी. व्ही. सेंटर हडको येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, नगरसेवक राजू वैद्य, सचिन खैरे, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाºयांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या निदर्शनाला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे गैरहजर होते.४‘संभाजीनगर हवे की औरंगाबाद’ या शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या घोषणेला मे २०१८ मध्ये ३० वर्षे पूर्ण होतील. दरम्यान १९९५ ते १९९९ हे साडेचार वर्षे राज्यात, १९९९ ते २००४ हे पाच वर्षे केंद्रात आणि मागील तीन वर्षांपासून केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत आहे. आजवर ३० पैकी साडेबारा वर्षे सेना सत्तेत असतानाही नामकरणाचा मुद्दा राजकीय मुद्दा बनूनच राहिला. दरम्यान सोशल मीडियावर शिवसेनेच्या या भूमिकेवरून जोरदार मॅसेजवॉर सुरू झाले आहे. याचा फटका कुणाला बसतो हे आगामी काळात पाहणे लक्षणीय राहील.शिवसेना हिंदुत्ववादीकुठे राहिलीशिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी निगडित हिंदुत्ववादी शिवसेना आता राहिली नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला. डॉ. कराड म्हणाले, जर हिंदुवाद कायम असता, तर जि.प. निवडणुकीत भाजपबरोबर सेनेने युती केली असती. फुलंब्रीत पक्षचिन्ह,भगवे उपरणे बाजूला ठेवून काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन शिवसेना नेत्यांनी प्रचार केला. लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील, त्यानुसार शिवसेना ‘संभाजीनगर’ नामकरणाचा मुद्दा उकरून काढते. १९९९ ला शिवसेनाप्रमुखांनी फक्त काँग्रेसचा महापौर होऊ नये, म्हणून सेनेचे नगरसेवक जास्त असताना हिंदुत्वासाठी महापौरपदी माझी वर्णी लावली होती. आताची शिवसेना तसा निर्णय घेणे शक्य नसल्याचे अलीकडच्या राजकारणावरून दिसते आहे. कारण शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेसशी घरोबा केला आहे. संभाजीनगर नामकरण ही शिवसेनेची नौटंकी राजकारणापुरती आहे. सर्व शिवपे्रमी जनतेला हे समजले आहे.