औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभेतील उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना ३१ वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला असून, अंतर्गत गटबाजी आणि अॅन्टी इन्कमन्बन्सी फॅक्टरमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेने उमेदवारी बदलली असती, तर निश्चित निवडणूक निकालाचे चित्र वेगळे असते, असे बोलले जात आहे. शिवसेनेच्या पराभवाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा हातभार लावला. जाधव हे या निवडणुकीचे गेमचेंजर ठरले असून, आ. इम्तियाज जलील यांना दलित-मुस्लिमांसह सुशिक्षित मतदारांनी लोकसभेचे द्वार खुले करून दिले.
शिवसेनेची पहिली शाखा मराठवाड्यात स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्या जिंकल्या. ही निवडणूक मात्र त्यांच्यासाठी घाम काढणारी ठरली. पक्षातील गटबाजी आणि अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडली. भाजपनेदेखील हातचे राखून काम केले. खा. रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी पूर्ण भाजपने काम केल्याचा आरोप खैरे यांनी मतमोजणीपूर्वी केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील जाधव यांना मदतीचा हात दिल्यामुळे खैरेंनी आखलेली रणनीती कोलमडली, याचाच फायदा आ. जलील यांना झाला, त्यांनी अतिशय भूमिगत पद्धतीने प्रचारतंत्र वापरून शिवसेनेच्या हिंदू-मुस्लिम या पारंपरिक राजकारणाला छेद देत विजयश्री खेचून आणली. या सगळ्या धामधुमीत काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांना १ लाख मतांचा पल्ला गाठता आला नाही. १६ तास चालेल्या मतमोजणी प्रक्रियेत क्षणाक्षणाला उत्कंठता शिगेला जात होती.
१९८० नंतर मुस्लिम समुदायाला संधीमुस्लिम समुदायाला १९८० नंतर खासदारपदी विराजमान होण्याची संधी आ. इम्तियाज जलील यांच्या रूपाने मिळाली आहे. ३९ वर्षांनंतर सोशल इंजिनिअरिंगच्या राजकारणाचा पॅटर्न राबवून भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खा. असदोद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने नवीन राजकीय समीकरणाची पायाभरणी औरंगाबादेत केली. त्याचे फळ म्हणून आ. जलील यांना ऐतिहासिक विजय मिळविता आला.२१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्तनिवडणुकीत २४ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २१ उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्केमतदान घेता आले नाही. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाले.
माझे बॅड लक असल्याचे म्हणाले खैरेपराभव होणार असल्याचे २३ व्या फेरीअंती खैरे यांच्या लक्षात आले होते; परंतु देवावर विश्वास आहे, निश्चित काहीतरी चांगला निकाल लागेल, असे खैरे म्हणाले; परंतु पुढील फेºयाअंती निकाल येताच माझे बॅड लक आहे, असे सांगून त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले.
जलील यांची विजयाची कारणे अशी-१) दलित-मुस्लिम मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ.२) अपक्ष उमेदवार जाधव यांनी खैरेंचे मतदान फोडले.३) ग्रामीण भागातील मतदान काँग्रेसकडे गेले नाही.४) शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध.५) शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले.चंदक्रांत खैरे यांच्या पराभवाची कारणे१) पारंपरिक प्रचार पद्धतीनेच मतदान मागितले.२) मनपातील राजकारणात ढवळाढवळीचा फटका.३) नवमतदारांच्या मनातील कल जाणून घेतला नाही.४) विकासाऐवजी सांप्रदायिक मुद्यांवर प्रचार.५) नाडी-पुडी, सबसे बड़ा बाबा या उपाधींमुळे अंधश्रद्धांध म्हणून टीका.