छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून आज पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरत्या वर्षांत कमी पावसामुळे सहा जिल्ह्यांतील तर दोन जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. रबी हंगामाच्या पेरण्यांचा अंतिम टप्पा असतानाच अवकाळी पावसाने पिकांचे माती केली. विभागातील १०७ मंडळातील सुमारे २ हजार १४० गावांतील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागीय प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यानंतर वस्तुस्थिती समाेर येईल. विभागात सुमारे ८ हजार ५५० गावे असून ४२५ मंडळ आहेत. त्यातील १०७ मंडळे रविवार २६ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : ६४० गावांत नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२ मंडळात पावसाने थैमान घातले. ६४० गावांमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उस्मानपुरा ७४ मि.मी., भावसिंगपुरा ८५ मि.मी., कांचनवाडी ७९ मि.मी., चौका ८६ मि.मी., कचनेर ६८ मि.मी., पंढरपूर ७३.७५ मि.मी., अडूळ ९३.५० मि.मी., बिडकीन ६८.२५ मि.मी., पाचोड ६८ मि.मी., मांजरी ६८.२५. मि.मी., भेंडाळा ६९ मि.मी., तुर्काबाद ७८.५० मि.मी., वाळुज ७३.७५ मि.मी., डोणगाव ९९.७५ मि.मी., असेगाव ६७.२५ मि.मी., शिवूर ८७.५० मि.मी., गारज ७६ मि.मी., महालगाव ७०.७५ मि.मी., जानेफळ ६८ मि.मी., कन्नड ६७ मि.मी., चाफानेर ६७ मि.मी., देवगाव ७२.२५ मि.मी., पिशोर ८६.२५ मि.मी., नाचनवेल ७९.५० मि.मी., चिंचोली लिंबाजी ६६.७५ मि.मी., वेरुळ १०७.५० मि.मी., सुलतानपूर १०३.७५ मि.मी., बाजारसावंगी ८६ मि.मी., गोळेगाव ६६.५० मि.मी., आमठाण ७३.२५ मि.मी., बोरगाव ७७.२५ मि.मी. तर फुलंब्रीमध्ये ८९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.
जालना : ५४० गावांना अतिवृष्टीचा दणका जालना जिल्ह्यात २७ मंडळांतील ५४० गावांना अवकाळी पावसाचा दणका बसला. त्यात भोकरदन ९५.७५ मि.मी., पिंपळगाव ७२.५० मि.मी., केदरखेडा ७५.७५ मि.मी., जाफ्राबाद ७१.७५ मि.मी., कुंभारजारा ७७.७५ मि.मी., टेंभूर्णी ८०.५० मि.मी., जालना शहर १०४.२५ मि.मी., वाघरुळ १३२.२५ मि.मी., नेर ७६.२५ मि.मी., शेवाळी ८१.५० मि.मी., रामनगर ७८.५० मि.मी., पाचनवड ७८.५० मि.मी., जामखेड ७२.५० मि.मी., रोहिलगड ८१.५० मि.मी., गोंदी ७० मि.मी., वडीगोद्री ७२.७५ मि.मी., वाटूर ६८.७५ मि.मी.,बदनापूर ९३.२५ मि.मी., शेलगाव १३२ मि.मी., बावणे ९२.५० मि.मी., रोशनगाव ९०.५० मि.मी., तिर्थपूरी ९०.२५ मि.मी., कु. पिंपळगाव ७२.५० मि.मी., अंतरवाली ७१.७५ मि.मी., तळणी ७४.२५ मि.मी., ढोकसाळ ७७.२५ मि.मी., पांगरी ८३.५० मि.मी. तर तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
परभणीत : ४६० गावांना अवकाळीचा फटकापरभणी जिल्ह्यातील २३ मंडळातील ४६० गावांतील रबी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे. त्यात परभणी १०२.५० मि.मी., जांब ७०.७५ मि.मी., झरी ७२ मि.मी., सिंगनापूर ७६.२५ मि.मी., पिंगळी ७६ मि.मी., केसापुरी ७२.५० मि.मी., जिंतूर १२९.७५ मि.मी., संगावी ८४ मि.मी., बामणी ८२ मि.मी., बोरी ८८.७५ मि.मी., अडगाव १०२.७५ मि.मी., चारठाण ७५.५० मि.मी., वाघी १००.७५ मि.मी., दुधगाव ८३.२५ मि.मी., पूर्णा ९७.७५ मि.मी., तडकळस ९१.७५ मि.मी., लिमाळा ६८.२५ मि.मी., कंठेश्वर ७५ मि.मी., चुडावा ९४.५० मि.मी., देऊळगाव ७६.७५ मि.मी., कुपटा ९४.५० मि.मी., कोलहा ७६.७५ मि.मी. तर तडबोरगाव मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.
हिंगोलीत २४० तर बीडमध्ये २० गावांत नुकसानहिंगोली जिल्ह्यात १२ मंडळातील २४० गावांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यात हिंगोली ७२.२५ मि.मी., बासंमबा ७०.२५ मि.मी., दिग्रस ८५ मि.मी., माळहिवरा ६६ मि.मी., कळमनुरी ७३.२५ मि.मी., वाकोडी ८३.७५ मि.मी., नांनदापूर ७९.२५ मि.मी., हत्ता ७४ मि.मी., औंढा ८३.५० मि.मी., येहाळेगाव ८७ मि.मी., सालना ८३ मि.मी. तर जावळा मंडळात ८७.५० मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात २४० गावांना तडाखानांदेड जिल्ह्यातील १२ मंडळातील २४० गावांतील रबी पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात नांदेड शहर ६८ मि.मी., लिंम्बगाव ९९ मि.मी., तारोडा ८२.२५ मि.मी., नाळेश्वर ७०.७५ मि.मी., उस्माननगर ७६.२५ मि.मी., सोनखेड ७६.२५ मि.मी., शेवडी ७४ मि.मी., कालमबार ७६.२५ मि.मी., ताम्सा ६५.२५ मि.मी., अर्धापूर ७७.५० मि.मी. तर दाभाड मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.