यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करून सोयाबीन या पिकाची लागवड करावी. तसेच बियाणास जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया, डाळवर्गीय पिकासाठी व एकदल वर्गीय पिकासाठी बीज प्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करून खर्चात बचत करावी. असे उपविभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हदगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तंत्र अधिकारी आघाव, मंडळ कृषी अधिकारी काळे, कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब निकम, कृषी सहायक राजेंद्र कवरे, लखन वाहुळे, सरपंच गोपीनाथ इंगोले, उपसरपंच श्रीमंत साळुंके, किरण साळुंके, संजय साळुंके, कैलास पाचे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फोटो : गोलटगाव येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण देताना कृषी अधिकारी व उपस्थित शेतकरी.