लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.मराठवाड्यात आजवर ५९ टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, पीक परिस्थिती सुधारत आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांत साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे.सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे.खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यात पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही.बीड जिल्ह्यात १ महिन्याचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर झाला आहे. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु या आठवड्यातील पावसामुळे पिके तरली आहेत.पिकांची सद्य:स्थिती अशीमराठवाड्यात मक्याच्या पिकाची परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात चांगली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे.तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे. मुगाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. उडदाच्या पिकावर काही जिल्ह्यात मावा पडला आहे. तर सोयाबीनच्या पिकावर पाने खाणाºया अळ्या दिसून येत आहेत. बाजरीच्या पिकाची परिस्थिती सुधारत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:17 AM
मराठवाड्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा असा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांनी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, असा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.
ठळक मुद्दे मराठवाडा : कापूस, मका, सोयाबीनवर होणार परिणाम