शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

श्रमदानातून खोदली आदिवासींनी विहीर

By admin | Published: May 30, 2016 12:54 AM

सुरेश चव्हाण , कन्नड दरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास

सुरेश चव्हाण , कन्नडदरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास श्रमदानातून विहीर खोदण्यास सुरुवात केली. १५ दिवसांच्या आत विहीर खोदून पूर्ण झाली अन् केवळ ३० फुटांवर पाणी लागल्याने ठाकरवाडीला आनंदाचे भरते आले. निमडोंगरी गु्रप ग्रामपंचायतअंतर्गत ठाकरवाडी आहे. वाडीत अख्खा ठाकर समाज, वाडीची लोकसंख्या जेमतेम ४००. बहुतेक सर्वजण ऊसतोड कामगार, उरलेल्या काळात थोडीफार असलेली शेती कसणे आणि मोलमजुरी हा यांचा व्यवसाय. वाडीत जाण्यासाठी असलेला कच्चा जोडरस्ता. वाडीला दरवर्षी पाण्याची टंचाई, प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात टँकर. ही समस्या कायमची दूर करण्याचे वाडीने ठरविले. वाडीपासून २ कि.मी.अंतरावर सरकारी इनाम (जमीन) आहे. या जमिनीपासून नाला आहे. या नाल्याच्या काठावर श्रमदानातून विहीर खोदण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. महाराष्ट्रदिनी काम सुरू करण्यात आले. निमडोंगरीचे सरपंच सुरेश नीळ व माजी सभापती शेकनाथ चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले.ग्रामपंचायतने क्रे न उपलब्ध करून दिले. विहिरीवर श्रमदान करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही सरसावल्या. विहिरीचे काम ३० फूट खोल झाले आणि विहिरीला पाणी लागले. सर्वांचा आनंद गगनात मावेना. या पाण्याचे पूजन उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्या हस्ते शाखा अभियंता कालिदास उपासनी, सरपंच सुरेश नीळ व ठाकरवाडी-निमडोंगरी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी विहिरीपासून वाडीपर्यंत पाईपलाईन करून देण्याची मागणी केली. उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांनी ठाकरवाडीच्या रहिवाशांचे कौतुक करून विहिरीपासून गावापर्यंत तात्पुरत्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी तांत्रिक बाबी तपासण्यासाठी पाणीपुरवठा विभाग खुलताबाद यांना आदेशित केले. ‘आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं’ या ना.धों. महानोरांच्या गीताप्रमाणे जंगलात अथवा डोंगर टेकडीच्या पायथ्याशी वस्ती करून राहणारा अशिक्षित आदिवासी ठाकर समाज काळानुरूप बदलताना दिसत आहे. एकीच्या बळाची महती त्यांना कळली आहे आणि म्हणूनच शासनाच्या भरवशावर न बसता ठाकरवाडी एकत्र आली आणि ‘आपुले भविष्य आपुल्या हाती’ या उक्तीप्रमाणे झपाटून कामाला लागले आणि नवीन इतिहास घडविला.