खुलताबाद: खुलताबाद नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज १० प्रभागातील २० जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. खुलताबाद नगर परिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी सिल्लोड संजीव मोरे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, प्रभारी मुख्याधिकारी बालचंद तेजीनकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.
प्रभाग सोडत पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक १) अ- अनुसुचित जातीसाठी राखीव ( एस. सी. ), ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३) अ- अनुसूचित जमाती महिला राखीव ( एस. टी.) , ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०) अ- अनुसूचित जाती महिला( एस. सी.) ब- सर्वसाधारण
१७ वरून २० सदस्य झाले खुलताबाद नगर परिषदेत पुर्वी आठ प्रभाग होते या आठ प्रभागातून १७ सदस्य निवडले जात होते. पंरतु आता दोन प्रभागाची वाढ होऊन आता १० प्रभाग झाले आहेत. या १० प्रभागातून २० सदस्य निवडले जाणार आहेत. खुलताबाद नगर परिषदेत ३ सदस्य वाढणार आहेत. प्रभाग वाढल्याने अनेकांनी आपला मोर्चा आता या तीन नवीन प्रभागाकडे वळविला आहे. खुलताबाद येथील प्रभाग क्रमांक ७ सात मध्ये अनेकांचे लक्ष राहणार आहेत. या प्रभागात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण अशा दोन जागा असल्याने निवडणूक चुरशीची होईल.