औरंगाबाद : नातेवाईक तरूणीसोबत अनैतिक संबंधाच्या रागातून दोन आरोपींनी एका तरूणाचे अपहरण करून खुन केल्याची घटना नानेगाव (ता. पैठण) येथे आज (दि.२९) उघडकीस आली. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी दोन्ही आरोपींनी अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला.
तुकाराम बाळासाहेब माने वय (२२) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहेत. तर अजिनाथ मोरे (रा. नानेगाव ता. पैठण), गोरख रामदास माळी (रा. बोरगाव ता.पैठण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (दि.२२) रात्री ९ वाजता नऊ वाजता घरातून तुकाराम घरातून बाहेर पडला होता. तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने कुटुंबियांनी तुकारामचा गावात शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. दरम्यान, तुकाराम घरी असताना ज्या तरूणाने त्याला बोलावून नेले तो गायब असल्याचे कुटूंबियाच्या लक्षात आले. यावरून कुटूंबियांनी तुकाराम याचे अपहरण झाल्याची तक्रार बुधवारी (दि.२४) पाचोड पोलीस ठाण्यात दिली होती.
यावरून पाचोड पोलिसांनी अपहरण झाल्याची नोंद करून तपास सुरू केला व संशयीत आरोपी अजिनाथ मोरे व गोरख माळी यांना सोमवारी (दि.२९) ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता नातेवाईक मुलीसोबत अनैतिक संबध असल्याच्या कारणावरून तुकाराम याचा रॉडने मारहाण करून त्याचा खून केला व प्रेत विहिरीत फेकल्याचे आरोपींनी कबुल केले.
आरोपींनी नानेगाव शिवारातील एका पडीक विहीरीत प्रेत फेकल्याचे सांगितले. मंगळवारी (दि.३०) पाचोड पोलिसांनी फौजफाट्यासह घटना स्थळ गाठले. विहिरीत बघितले असता एका तरूणाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. पाचोड ठाण्याचे सपोनि. अभिजित मोरे, फौजदार गोरक्षनाथ खरड, प्रदिप ऐकशिंगे, शिंदे, जमादार सुधाकर मोहीते, संजय चव्हाण, रामदास राख, पोलीस पाटील संतोष बोधने यांनी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत विहिरी बाहेर काढण्यात आले. यावेळी मृतदेहाला मोठ मोठे दगड बांधल्याचे दिसून आले. बालानगर आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आधिकारी डॉ. मनियार यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार व एटीमए कार्डवरून त्याची ओळख पटविण्यात आली. दुपारी उशीरा मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने दंगा काबु पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी बाळासाहेब माने यांच्या फिर्यादीवरून अजिनाथ मोरे, गोरख माळी यांच्याविरूद्ध पाचोड ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्ूपर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सपोनि. मोरे हे करीत आहेत.