छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा, खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील पहिले अवयवदान छत्रपती संभाजीनगर शहरात १५ जानेवारी २०१६ रोजी झाले; परंतु मराठवाड्यात फक्त किडनी, लिव्हर, हृदय आणि नेत्रदान होत आहे. इतर अवयवांची गरज असलेल्या रुग्णांना देशभरात भटकंती करावी लागत आहे.
दरवर्षी देशपातळीवर २७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यात येत असे. मात्र, गतवर्षीपासून ३ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. मराठवाड्यात आजघडीला दोनच नॉन-ट्रान्स्प्लांट ऑर्गन रिट्रॅव्हल सेंटर (एनटीओआरसी) आहेत. हे सेंटर वाढले तर अवयवदान आणखी वाढेल. जवळपास १३ रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण होते. खासगी रुग्णालयांच्या भरवशावरच अवयवदान सुरू असून, सरकारी रुग्णालयांत अवयवदानाची प्रतीक्षाच आहे.
ब्रेनडेड व्यक्तीचे कोणते अवयवदान शक्य?ब्रेनडेड व्यक्तीचे दोन्ही किडनी, लिव्हर, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस, डोळे यांसह हाडे, त्वचा दान करून ६ ते ९ गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. याबरोबरच हात आणि पायाचेही दान करता येते.
मराठवाड्यात कोणते अवयवदान?मराठवाड्यात आजघडीला किडनीदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ, नेत्र, लिव्हरदान अधिक आहे. याबरोबरच हृदयदानही होत आहे.
या अवयवदानाची प्रतीक्षामराठवाड्यात स्वादुपिंड, फुप्फुस, हाडे, त्वचादानाची प्रतीक्षा आहे. हाडे, त्वचादानासाठी स्किन बँक आणि बोन बँक आवश्यक आहे. मराठवाड्यात हाताचे दान होत नसल्याने परभणीतील एका चिमुकलीला हात मिळण्यासाठी देशभर शोध घ्यावा लागला.
मराठवाड्यात आठ वर्षांत किती ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदान ? -३७मराठवाड्यात झालेले अवयवदान- हृदय-१३- लिव्हर-३१- किडनी-७२- नेत्र-३८
- लिव्हरच्या प्रतीक्षेतील रुग्ण - १५०- किडनीच्या प्रतीक्षेतील रुग्ण - ३६०
घाटीला पुन्हा ''एनटीओआरसी'' परवानगीनॉन-ट्रान्स्प्लांट ऑर्गन रिट्रॅव्हल सेंटर म्हणून घाटी रुग्णालयाला परवानगी मिळाली. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा अवयवदान सुरू होईल. यापूर्वी फेब्रुवारी २०१६ आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये घाटीत अवयवदान झाले. पुन्हा प्रयत्नशील असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले.
जनजागृती वाढलीअवयवदानासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जागृती वाढली आहे. अवयवदानाचे प्रमाण आणखी वाढण्यासाठी 'एनटीओआरसी'ची संख्या वाढली पाहिजे. शासकीय रुग्णालयेदेखील 'एनटीओआरसी' व्हावीत; कारण तेथे सर्वाधिक रुग्ण येतात.- सय्यद फरहान हाश्मी, मुख्य प्रत्यारोपण समन्वयक, झेडटीसीसी