- स.सो. खंडाळकर
२ आॅक्टोबर १९९३ रोजीची दरवर्षीप्रमाणे निघणारी लोकमतची राष्ट्रीय एकात्मता रॅली रद्द करण्यात आली. भूकंपग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर अन्न, वस्त्र व रोख मदत पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीला दिवंगत झुल्फिकार हुसेन, प्र.ज. निकम गुरुजी, डॉ. शांताराम काळे, वसंत नरवडे, एम.ए. गफार, राम भोगले, डॉ. पुरुषोत्तम दरख, भागचंद बिनायके, मनसुख बांठिया, मनमोहन अग्रवाल, नगीन संघवी, भिकचंद दोशी, विमल टिबडीवाला, एस.पी. जवळकर, राम पातूरकर, सुभाष झांबड, शरद परिहार, विमल टिबडीवाला, कुलदीपसिंग निºह, व्ही.सी. बजाज, प्रा. शंकरराव वनवे, विनोद मेहरा, चेनराज देवडा, सूरजितसिंग खुंगर, तनसुख झांबड, प्रकाश राठी, दिलीप सोनी, संतोष लुणिया, दिलीप गौर, जगन्नाथअप्पा वाडकर, रतिलाल मुगदिया, फादर मायकेल डिसोझा, एम.के. अग्रवाल, शरद बन्सल, शिवाजी लिंगायत, सतीश सिकची, अनिल मिश्रा, आर.जी. मालानी, त्रिलोक पांडे, दिलीप चोटलानी, शांताराम जोशी, एस.एल. देशमुख, जितेंद्र तोतला, विजय छाजेड, संजय बलदवा, अनिल अग्रवाल, नीरज तोटावार, सत्यनारायण अग्रवाल, सतीश लड्डा, मनोज भारुका, रमेशचंद्र जोशी, शिरीष बोराळकर, रत्नाकर पंडित, अशोक मालू यांच्यासह कितीतरी महत्त्वाची माणसे राजेंद्र दर्डा यांच्या हाकेला ओ देऊन जमा झाली होती.
भूकंपग्रस्तांसाठी ब्लँकेटस्, सतरंजी, बादली, पातेले, इतर भांडी धान्य घेऊन वाहने रवाना करण्यात आली. मदत नेमकी कोठे व कशी पुरवायची, यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली. ही समिती राजेंद्र दर्डा यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत होती. दिवंगत जवाहरलाल दर्डा हे त्या काळात राज्याचे उद्योगमंत्री होते. भूकंपग्रस्तांना उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणावर मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचा परिणाम म्हणूनही मदतकार्याला वेग आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिकातत्कालीन जिल्हाधिकारी प्रमोद माने यांचीही यातली भूमिका अत्यंत सकारात्मक राहिली. आता ते हयात नाहीत; पण भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. लोकमतच्या आवाहनानुसार विविध संस्था-संघटनांनी मोठा पुढाकार घेतला. पहाटेच्या काळोखात गाडल्या गेलेल्या खेड्यांना दिलासा देण्याचं व त्यांच्यासाठी काही तरी करीत राहण्याची भूमिका लोकमतनं सातत्यानं घेतली. त्याचाच एक भाग म्हणून १९९६ साली सास्तूर येथे अंगणवाड्या उभारण्यात आल्या. राजेंद्र दर्डा यांचा यातला सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन, त्यांच्या हाकेला ओ देऊन पुढे आलेली मंडळी व लोकमतचे उत्कृष्ट टीमवर्क यातूनच हे महत्कार्य घडत गेलं.