शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

'गर्लफ्रेंडसाठी त्याचा गेम केला'; एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 3:27 PM

मित्राच्या गर्लफ्रेंडवरील एकतर्फी प्रेमातून केला खून

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून जीवलग मित्र अजय शत्रुघ्न तिडके याचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली मंगेश सुदाम वायवळ (रा. समसापूर, ता. परभणी) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम मयताचे वडील तथा फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे.

मयत अजय तिडके (रा. शहापूर, ता. खामगाव, जि. बुलडाणा) याचे वडील शत्रुघ्न तिडके यांनी फिर्याद दिली होती की, अजय आणि मंगेश नोव्हेंबर २०१७पासून सोबत राहात होते. एनएसएसच्या कॅम्पदरम्यान अजयची एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती. मंगेश जीवलग मित्र असल्याने अजय त्याच्यासोबत प्रत्येक माहितीची देवाण-घेवाण करत असे. अजयच्या प्रेयसीवर मंगेशचे एकतर्फी प्रेम जडले होते.

घटनेच्या काही महिन्यांपूर्वी मंगेश पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता. ३१ मार्च २०१८ रोजी मंगेश पुण्याहून शहरात आला. ३ एप्रिल २०१८ रोजी तो अजय राहात असलेल्या रामेश्वर बिल्डींगमध्ये मुक्कामासाठी गेला. ४ एप्रिल २०१८ रोजी भीमजयंती उत्सवानिमित्त विद्यापीठात गायनाच्या कार्यक्रमासाठी अजय हा रुम पार्टनर अनिल भोजने आणि सचिन वानखेडे यांच्यासोबत गेला, तर मंगेश अजयच्या रुमवर झोपला होता.

गळा आवळून खूनरात्री ११:३०च्या सुमारास अजय व त्याचे रुमपार्टनर रुमवर आले. आपल्याला अजयशी खासगी बोलायचे आहे, असे बोलून मंगेशने सचिन आणि अनिल यांना दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. त्यामुळे ते दोघे दुसऱ्या रुममध्ये झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे मंगेशने सचिन आणि अनिल यांना उठवून, प्रेमात अडसर ठरत असल्याने आपण अजयचा गळा आवळून गेम केल्याचे सांगितले. आपण पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगून मंगेश तेथून निघून गेला. याबाबत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणी व शिक्षातपासाअंती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी लोकअभियोक्ता अजित अंकुश यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी मंगेशला दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय