वाळूज महानगर : वाळूज येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत सोमवारपासून किसान क्रेडिट कार्डचे वाटप सुरु करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, शेती औजारे आदीसाठी तात्काळ कर्ज मिळावे, यासाठी किसान केड्रिट योजना सुरु केली आहे. वाळूजच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत येणाºया परिसरातील कार्यकारी सेवा सोसायटीतील शेतकºयांना क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात येणार आहे.
या परिसरात जवळपास ६ हजार शेतकरी सभासद असून, त्यांना सोमवारी वाळूजच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत उपनिबंधक ए.आर.पुरी, बँकेचे संचालक नंदकुमार गांधिले, सहकार अधिकारी बी.एस.नवथर, बँकेचे ए.व्ही.रिठे, एच.के.जाधव, एम.आर.वाघ, जनार्धन देवकर आदींच्या उपस्थितीत कार्र्ड देण्यात आले. या कार्डाचे वाटप २० फेब्रुवारीपर्यंत केले जाणार असून, शेतकºयांनी आधारकार्ड, पासबुक, पॅनकार्ड आदी कागदपत्रे घेऊन बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी वाळूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सर्जेराव भोंड, नारायणपूचे सब्जर पटेल, हबीब पटेल, बबनराव गायकवाड, सर्जेराव निकम, आर.एस.साळुंखे, सचिव बी.ए.पाठे, डी.आर.उगले आदी उपस्थित होते.